#SakalForMaharashtra उद्योजकतेसाठी फॅशन डिझायनिंग उपयुक्‍त 

residentional photo
residentional photo

      बहुतांश विद्यार्थी करीअरचे पारंपारीक मार्ग निवडतात. मग नंतर रोजगार मिळविण्यासाठी धडपड करतात. वास्तविक पाहता बदलत्या जगात जीवनशैली महत्वाची मानली जाऊ लागली आहे. अर्थात फॅशन डिझाईनींग क्षेत्राचेही महत्व वाढले आहे. दुदैवाने या क्षेत्राला पोषक अशी व्यवस्था अद्याप निर्माण होऊ शकलेली नाही. उद्योजकता विकास घडवायचा असेल तर या क्षेत्राला प्रोत्साहन देण्याची गरज आहे. 

   राज्यात सध्या आरक्षणाचा मुद्दा गाजतो आहे. शिक्षणात नक्‍कीच आरक्षण द्यावे. परंतु शिक्षण घेतांना प्रत्येक घटकातील विद्यार्थ्याला पुढील परीस्थितीला सामोरे जाण्यासाठी सक्षम बनविणे महत्वाचे ठरेल. विद्यार्थी सक्षम झाला तर त्याला पुढे जाऊन नोकरीत आरक्षणाची गरज भासणार नाही. प्रत्येकाने नोकरीच केली पाहिजे असेही नाही. उद्योगांच्या माध्यमातून चांगले उत्पन्न मिळविण्यासाठी अन्य काहींच्या हातांना काम देता येऊ शकते.

   विद्यार्थिनी, महिलांसाठी अत्यंत सुरक्षित असे फॅशन डिझायनिंगचे क्षेत्र आहे. घर बसल्या काम करतांना चांगले उत्पन्न मिळविण्याची संधी आहे. शासनाच्या विविध योजनादेखील उपलब्ध आहेत. या माध्यमातून उद्योजकता विकास घडविता येऊ शकतो. शिक्षणातून घडणाऱ्या नवउद्योजकांनी सुरू केलेले उद्योग तग धरू शकतील, याची व्यवस्था करण्याचीही गरज आहे. सद्य स्थितीत चीनी उत्पादने बाजारपेठेत फोफावता आहेत.

     भारतीय उत्पादनाच्या विक्रीवर थेट परीणाम होत असून, उद्योगांवर विशेषत: फॅशन क्षेत्राशी निगडीत उद्योगांवर परीणाम होतो आहे. यावरही तोडगा काढणे महत्वाचे ठरेल. सामाजिक प्रश्‍नाच्या सोडवणूकीसाठी "सकाळ'च्या उपक्रमात सहभागी होतांना महिला, युवतींना या क्षेत्रातील करीअरच्या संधीविषयी मार्गदर्शन करण्याचा मानस आहे. 
-श्रृती भुतडा, 
संचालिका, सॅव्ही वूमन कॉलेज. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com