त्याने दिलेली लाखमोलाची मदत..!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 ऑगस्ट 2019

 नाशिक-दुपारचे दोन वाजले होते... सकाळच्या कार्यालयात पूरग्रस्त कोल्हापूर येथे मदत पाठवण्याची लगबग सुरु होती... 
▫तनिष्का भगिनींसह नाशिकमधील काही सेवाभावी संस्थांचे कार्यकर्ते गाडीत साहित्य भरत असताना एक पंचविशीतील युवक सकाळच्या गेटवर आला... 
▫सिक्युरिटी गार्डला विचारून मलाही पूरग्रस्त नागरिकांना मदत द्यायची असे सांगून तो सकाळ कार्यालयात आला... हातात एक पिशवी, अंगावर फाटलेले कपडे, पँटला पाठीमागे ठिगळं जोडलेली... 
▫माझ्याजवळ आल्यानंतर त्याने मला मदतीचा हेतू बोलून दाखवत असतानाच त्याला हुंदका दाटून आला... शिपायाने त्याला पाणी दिल्यानंतर तो थोडा शांत झाला... 

▫मी त्याला धीर देत असतानाच, त्या युवकाने बोलायला सुरुवात केली...
मी सातपूर एमआयडीसीत एका कंपनीत कंत्राटी कामगार म्हणून नुकताच गेल्या महिन्यात कामाला लागलो... 
▫मी जळगाव जिल्ह्यातील... घरची परिस्थिती जेमतेम... गेल्या महिन्यात मला 12 दिवसांच्या कामाचा पगार मिळाला... कपडे नव्हते म्हणून मी माझ्यासाठी टेलरकडून या पैशांतून कपडे शिवून घेतले... 
▫मला पूरग्रस्तांना मदत द्यायचीय, पण माझ्याकडे पैसे नाहीत... मी शिवलेला ड्रेस आजच मी घेऊन आलोय... हा तुम्ही माझ्या वतीने पूरग्रस्त भागात पाठवा... त्याच्या मनाचा मोठेपणा पाहून मी चक्रावून गेलो... 
▫स्वतःच्या अंगावर ठिगळं जोडलेली असताना परोपकारी वृत्ती ठेवून दाखवलेला मनाचा मोठेपणा खूप काही सांगून गेला... 
▫मी त्याला नकार देत असतानाच तो मध्येच उत्तरला... माझ्याकडे सध्या देण्यासारखे फक्त मी शिवलेला हा एक ड्रेस आहे... माझी मदत कोल्हापूरपर्यंत पोहचवा... असे म्हणत ड्रेसची पिशवी माझ्या हातात सोपवत अश्रूंनी भरलेले डोळे पुसत पुसत तो युवक (परिस्थितीने गरीब मात्र मनाची अफाट श्रीमंती असलेला...) सकाळ कार्यालयातून बाहेर पडला... 
▫मी त्याला त्याचा पत्ता विचारला, मात्र न देताच माघारी गेला... स्वतःच्या अंगावर फाटलेले कपडे असताना सामाजिक जाणीव जपणाऱ्या या युवकाने जाताना, "मी नक्कीच कधीतरी भविष्यात माझ्या परीने मोठी मदत करण्यासाठी परत येईल..." हे त्याचे शब्द नक्कीच मनात घर करून गेले... 
▫मदत करण्यासाठी मनाची श्रीमंती घेऊन आलेल्या या युवकाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकी अजूनही घट्ट करत माणुसकी जिवंत असल्याचे दाखवून दिले... 
▫त्या युवकाने सकाळ रिलिफ फंडाकडे जमा केलेली मदत नक्कीच लाखमोलाची आहे...!

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sakal relief fund