एकीकडे माझा देश दुसरीकडे माझा संघः शैलजा जैन,सकाळ दिवाळी अंकाचे प्रकाशन 

live
live

नाशिक: एका बाजूला माझा देश होता, दुसरीकडे मी उभा केलेला इराणचा संघ होता. उपांत्य फेरीत चित्र स्पष्ट झाल्यापासून अस्वस्थ होते. पण अंतिम सामन्याच्या रात्री 
रात्रभर झोप आली नाही. मी प्रशिक्षक असलेला इराणचा संघ जिंकला. तेव्हा सगळा संघ जल्लोषात बुडाला असतांना मी मात्र तेथून दूर निमूटपणे निघून गेले. काय स्थितीला तोंड दिले हे मलाच माहीती इतरांना त्याची कल्पना येणार नाही. अशा शब्दात अशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक विजेत्या इराणच्या महिला संघाच्या प्रशिक्षक शैलजा जैन यांनी सकाळ "आशियाई कब्बडीच्या अंतिम सामन्यापासून त्यांच्या मनात सुरु असलेल्या अस्वस्थतेला वाट करुन दिली. 

     सकाळ'च्या सातपुर कार्यालयात आयोजित "सकाळ' नाशिक आवृत्तीच्या दिवाळी अंक 2018 प्रकाशनाचे. या अंकाच्या प्रकाशन सोहळ्यात सांस्कृतिक-क्रीडा विषयक परीसंवाद रंगला होता. कार्यक्रमास "सकाळ'च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक श्रीमंत माने, अभिनेत्री गौरी किरण, आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव, रणजीपटू सत्यजीत बच्छाव, सी. के. नायडू स्पर्धेतील महाराष्ट्राचा कर्णधार मुर्तुझा ट्रंकवाला, कबड्डीच्या प्रशिक्षिका शैलजा जैन, नेमबाजीच्या प्रशिक्षिका मोनाली गोऱ्हे, युवा उद्योजिका रंगोली कुटे, अभिनेत्री शिरीन पाटील, मिस टीन युनिव्हर्स इंडिया किताब विजेती श्रीया तोरणे यांच्यासह "साई'चे प्रशिक्षक विजेंद्र सिंग, जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव समीर रकटे, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ.स्वप्नील तोरणे, लेखक दत्ता पाटील आदी उपस्थित होते.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com