#BattleForNashik-मी नाशिकच्या प्रगतीसाठी अन्‌  विरोधक जातीवर मागताहेत मते-  समीर भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 एप्रिल 2019

नाशिक, ः नाशिकच्या विकास आणि भविष्याच्या विस्तारासाठी आघाडी सरकारच्या काळात विविध विकासाची कामे केली. आगामी काळात नाशिकला अधिकाधिक प्रगतीवर नेण्यासाठी मी मत मागतो आहे. विरोधक मात्र जातीवर मते मागताहेत, अशी टीका नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज येथे केली. 

नाशिक, ः नाशिकच्या विकास आणि भविष्याच्या विस्तारासाठी आघाडी सरकारच्या काळात विविध विकासाची कामे केली. आगामी काळात नाशिकला अधिकाधिक प्रगतीवर नेण्यासाठी मी मत मागतो आहे. विरोधक मात्र जातीवर मते मागताहेत, अशी टीका नाशिक लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांनी आज येथे केली. 

व्ही. एन. नाईक संस्थेत विद्यार्थ्यांशी संवाद साधताना भुजबळ म्हणाले, की "तरुणांच्या हाताला काम, शेतमालाला दाम', हा माझा दृढनिश्‍चय आहे. नाशिकला "आयटी सिटी' बनविण्याचा माझा संकल्प आहे. त्यासाठी आघाडी सरकारच्या काळात रस्ते, रेल्वे, विमानसेवा अशा दळणवळणाच्या सुविधांचा विकास केला. मात्र मागील पाच वर्षांत कामे थांबल्याने नाशिकचा विकास खुंटला. आघाडी सरकारच्या काळात महिला उद्योजकांना हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी दिल्लीच्या हाटच्या धर्तीवर कलाग्राम प्रकल्प बनविला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव मिळावा, यासाठी वडगाव पिंगळा येथे 60 एकर जागेत फूड पार्क मंजूर करून घेतले. त्याचबरोबर कृषी टर्मिनल मार्केटदेखील मंजूर करून घेतला. नाशिकमध्ये शिक्षण संस्थांचे मोठे जाळे असल्याने त्यादृष्टीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रासाठी शिवनई येथे जागा उपलब्ध करून घेतली. पर्यटनासाठी शहरात बोट क्‍लब, साहसी क्रीडा संकुल उभारले. मात्र गेल्या पाच वर्षांत हे प्रकल्प सुरू करण्याऐवजी नाशिकच्या बोटी पर्यटनमंत्र्यांच्या जिल्ह्यात पळविल्या गेल्या. 
ते म्हणाले की, देशात दिल्लीतील संसद रोडवर संविधानाची प्रत जाळली जाते. मात्र त्यांच्यावर कारवाई होत नाही. देशात सध्या मनुवादाचा पुरस्कार केला जात असून, संविधान व लोकशाही वाचविण्यासाठी सरकारला पायउतार करण्याची गरज आहे. 

विद्यार्थ्यांनी विचारलेले प्रश्‍न 
श्री. भुजबळांना विचारलेले प्रश्‍न असे ः रोजगार, एकलहरे प्रकल्प, नाशिक चित्रपटसृष्टी, चित्रपट कलाकारांना व्यासपीठ, औद्योगिक विकास, आयटी, पेट्रोल दरवाढ, महागाई, क्रीडा, महिला सुरक्षा, वाढती गुन्हेगारी, नाशिकचा रखडलेला विकास. सर्व प्रश्‍नांची उत्तरे श्री. भुजबळांनी दिली. 

Web Title: marathi news sameer