#BATTLE FOR NASHIK-आश्‍वासनांची खैरात करणारे सरकार- समीर भुजबळ

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

नाशिक : भारतीय जनता पक्षाचे सरकार जुमल्याचे आणि आश्‍वासनांचे सरकार असून, पाच वर्षांत त्यांनी फक्त आश्‍वासनांची खैरात केली असून, विकासाच्या नावाने शिमगा केल्याची टीका राष्ट्रवादी कॉंग्रेस-कॉंग्रेस व मित्रपक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीचे अधिकृत उमेदवार समीर भुजबळ यांनी केली. त्यांचा शुक्रवारी (ता. 5) नाशिक तालुक्‍यातील गोवर्धन गट येथे प्रचारदौरा झाला. त्या वेळी त्यांनी नागरिकांशी मुक्त संवाद साधला. 

श्री. भुजबळ यांनी तिरडशेत येथून दौऱ्याला प्रारंभ केला. त्यानंतर वासाळी, महिरावणी, दुडगाव, गणेशगाव, पिंपळगाव गरुडेश्‍वर, गणेशगाव, राजेवाडी, गोविंदपूर, शिवणगाव, गोवर्धन, सावरगाव, गंगावऱ्हे या भागांतील ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आला. माजी खासदार देवीदास पिंगळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, रत्नाकर चुंबळे, निवृत्ती अरिंगळे, विष्णुपंत म्हैसधुणे, हिरामण खोसकर, बाळासाहेब म्हस्के, नाना बच्छाव, दिलीप खैरे, सुनील सूर्यवंशी, शानू निकम, दीपक वाघ आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

समीर भुजबळ म्हणाले, की भाजप सरकारने आदिवासींचे आरक्षण कमी करून ते धनगर समाजाला देऊ केले आहे. त्यामुळे समाजा-समाजामध्ये तेढ निर्माण करून राजकीय स्वार्थ साधण्याचा हा डाव आहे. आगामी काळात आपण सत्तेत आल्यानंतर निश्‍चितच आदिवासीं तसेच धनगर बांधवांसाठी नवनवीन योजना राबविण्यासाठी प्रयत्न करू. 

समीर भुजबळ यांनी राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून प्रचारास सुरवात केली. प्रचारदौरा सुरू असताना ठिकठिकाणी त्यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. या वेळी त्यांनी गावागावांतील ग्रामस्थांशी मुक्त संवाद साधला. या वेळी गत पाच वर्षाच्या कालावधीत नाशिक लोकसभा मतदारसंघाचा विकास पूर्णपणे गोठला असून, पुन्हा एकदा नाशिकला प्रगतिपथावर नेण्यासाठी युती सरकारला त्यांची जागा दाखवून देऊ, अशा भावना उपस्थित ग्रामस्थांनी भुजबळ यांच्याकडे बोलून दाखविल्या. 
 
Web Title: marathi news SAMEER SAYS