समृध्र्दी महामार्ग अखेर शिवडे ग्रामस्थाचा संयुक्त मोजणी प्रतिसाद 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 9 मे 2018

नाशिक: समृध्दी महामार्गासाठी जमीन देण्यास सुरुवातीला तीव्र विरोध करणाऱ्या शिवडे (ता.सिन्नर) येथील ग्रामस्थांनी आज प्रशासनासोबत एकत्र येत, संयुक्त मोजणी सुरु केली. मोजणीला ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे आज शिवडेसह 3 गावातील सुमारे 180 गटातील साधारण तिनशेवर शेतकऱ्यांच्या जमीनीचे मोजदाद झाली. आतापर्यत मोजणी न झालेल्या सुमारे 4.59 किलोमीटर अंतराची मोजदाद झाली. 

नाशिक: समृध्दी महामार्गासाठी जमीन देण्यास सुरुवातीला तीव्र विरोध करणाऱ्या शिवडे (ता.सिन्नर) येथील ग्रामस्थांनी आज प्रशासनासोबत एकत्र येत, संयुक्त मोजणी सुरु केली. मोजणीला ग्रामस्थांनी सहकार्य केल्यामुळे आज शिवडेसह 3 गावातील सुमारे 180 गटातील साधारण तिनशेवर शेतकऱ्यांच्या जमीनीचे मोजदाद झाली. आतापर्यत मोजणी न झालेल्या सुमारे 4.59 किलोमीटर अंतराची मोजदाद झाली. 

समृध्दी महामार्गाला जमीन देण्यास शिवडे ग्रामस्थांचा तीव्र विरोध असून त्याविरोधात ग्रामस्थ व प्रशासनात अनेकदा वाद झाले. बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकला 
येउन मध्यस्थी केल्यानंतरही ग्रामस्थांनी त्यांच्या मागण्याबाबत ठाम राहून विरोध कायम ठेवला होता. मात्र आता ग्रामस्थ आणि प्रशासन यांच्यात किमान संयुक्त मोजणीला 
तरी सहमती झाली आहे. आज उपजिल्हाधिकारी विठ्ठल सोनवणे, तहसिलदार नितीन गवळी, मिनाक्षी राठोड, भुमी अभिलेख अधिक्षक श्री देशमुख, पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख, तलाठी कविता गांगुर्डे, शेतकरी सोमनाथ वाघ, अनिल शेळके, अंबादास वाघ, बाजीराव हारक, जयराम चव्हाणके,विलास हारक, भास्कर वाघ, एकनाथ हारक, राजाराम हारक आदीसह शेतकरी उपस्थित होते. 

   तत्पूर्वी दुसरीकडे भूसंपादनासाठी प्रतिसाद न मिळणाऱ्या जागांसाठी सक्तीच्या भूसंपादनासाठी प्रस्ताव करण्याचे काम सुरु झाले आहे. लवकरच संपादीत जमीनीच्या तारणावर महामार्गासाठी कर्जाची उभारणी केली जाण्याची शक्‍यता आहे.नागपूर मुंबई समृध्दी महामार्गासाठी जमीन देण्यास विरोध असलेल्या गावातील जमीन संपादनासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरु आहे. शिवडे (ता.सिन्नर) सह पंचक्रोशीतील विरोध असलेल्या गावातील जमीनी खरेदीसाठी प्रतिसाद मिळू लागल्याने प्रशासन आशावादी आहे. मात्र 
ज्या गावात प्रतिसादच मिळणार नाही. अशा ठिकाणी मात्र, जमीनीच्या अंर्तगत वादाचे तिढे सुटत नसल्याने मेटाकुटीला आलेल्या प्रशासकीय यंत्रणेने आता सक्तीचे भूसंपादनाची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविला जाणार आहे. 

जमीनीवर कर्ज उभारणी 
प्रतिसाद मिळत नसलेल्या जागांच्या संपादनासाठी शासनाकडे प्रस्ताव मंजूरी आल्यानंतर ही प्रक्रिया सुरु होईल. पुढील आठवड्यात महामार्गाच्या निविदा उघडल्या जाणार आहे. लागलीच त्यावर काम सुरु करण्यासाठी पैशाची गरज लागणार असल्याने आतापर्यत संपादीत झालेल्या जागा तारण ठेउन त्या जागांवर कर्जाची उभारणी करीत, कामाला गती देण्याचे नियोजन वरिष्ठ स्तरावर सुरु झाल्याचे समजते. संपादीत झालेल्या जमीनी कर्जाउ ठेउन त्यावर कर्जाने पैसा उभारुन कामाला गती देण्याच्या प्रक्रियेला पुढील दोन आठवड्यात गती येणार आहे. 
 

Web Title: marathi news samrudhi mahamarg