भ्रष्टाचार केला तर कान का पकडला नाही-सानपांचे मुख्यमंत्र्यांना उत्तर 

residentional photo
residentional photo

नाशिक: पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजप उमेदवाराविरोधात बंडखोरी केलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आमदार बाळासाहेब सानप यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भ्रष्टाचाराचे आरोप करून टीका केल्यानंतर त्यास सानप यांनी प्रत्युत्तर दिले आहे. उमेदवारी नाकारलीच आता भ्रष्टाचारी ठरवून माझ्या विकासकामांची चेष्टा तरी करू नका, मी जर भ्रष्टाचार केला असेल तर पाच वर्षांत एकदा तरी माझा कान का पकडला नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 

पूर्व मतदारसंघातून भाजपकडून आमदार सानप यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरी करत राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळविली. त्या पार्श्‍वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारच्या सभेत सानप यांना भ्रष्टाचारामुळे उमेदवारी नाकारल्याची टीका केली होती. सानप यांनी शुक्रवारी (ता. 18) त्यावर उत्तर दिले.
 ते म्हणाले, की मुख्यमंत्री माझ्यापेक्षा मोठे असल्याने त्यांच्या आरोपांना मी प्रत्युत्तर देणार नाही, महाजनादेश यात्रेवेळी मी त्यांच्या खांद्याला खांदा लावून उभा राहिलो. त्या वेळी त्यांना भ्रष्टाचार दिसला नाही. आता किमान माझी विनंती आहे, मला भ्रष्टाचारी ठरवून माझ्या विकासकामांची चेष्टा करू नका. मी भ्रष्टाचार करत होतो तर पाच वर्षे गप्प का राहिले, वरिष्ठ म्हणून माझा कान धरायला पाहिजे होते. उमेदवारी नाकारण्यासाठी चुकीचे कारण पुढे करून माझे खच्चीकरण करण्याचा हा भाग आहे. गेली तीस वर्षे मी पक्ष सांभाळताना विस्तार केला. उमेदवारी नाकारायची होती तर मला विश्‍वासात घ्यायला हवे होते. किमान निष्ठावान कार्यकर्त्याला उमेदवारी दिली असती तर मी स्वत: त्याच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतली असती. मात्र उपऱ्यांना उमेदवारी देऊन निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय झाल्याचे सानप म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com