विरोधी पक्ष नावालाच-राऊत,धोनीला शिवसेना चांगला पर्याय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 13 जुलै 2019

नाशिक - लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का हे मी शोधत घेत आहे. गेली चार वर्षे विरोधकांची भूमिका शिवसेनेनं घेतली त्यावेळेस विरोधक कुठे झोपले होते,असा सवाल शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केला. 

   श्री.राऊत म्हणाले, सध्या मी  विरोधकांचे पक्ष आहे तरी कुठे आहे. याचा शोध घेत आहे. काही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळत नाही., त्यांनी जाहिरात दिली अध्यक्ष पाहिजेत म्हणून. काही थोडेफार राहिलेले पक्ष दिसताय ते येत्या दहा पंधरा दिवसात शिवसेना भाजपात विलीन होतील असा खोचक टोला त्यांनी लगावला. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलतांना राऊत म्हणाले, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना नेहमी आवाज उठवते, सत्तेत असो व नसो. पीकविमा बाबत ज्या त्रुटी असतील त्या दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेनं भूमिका घेतली, सत्तेत असूनही पीक विमा कंपन्यांच्या विरोधात गेलो.  राजू शेट्टी यांनी स्वतः आंदोलनात सहभागी व्हावे नाहीतर स्वतः आंदोलन करावे.- राजू शेट्टीना लोकसभेऐवजी जनतेनं त्यांना घरी पाठवलं आहे हे त्यांनी विसरू नये असेही ते म्हणाले, 
कर्नाटक आमदारांना महाराष्ट्र संस्कृती समजेल   
कर्नाटक राजकारणावर बोलतांना ते म्हणाले, महाराष्ट्रातील काही आमदार यापूर्वी कर्नाटकमध्ये राहिले आहेत. कर्नाटक मधील आमदार मुंबईत आले असतील तर बिघडले कुठे.  ते मुंबईत आहे पाकिस्तान मध्ये नाही.  त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजून घेता येईल.  आमचा महाराष्ट्राच्या बेळगावचा सीमा प्रश्न आहे, अनेक देवळात जातात., देव त्यांना सद्बुद्धी देईल आणि सीमा भागातील जो सातत्याने अत्याचार सुरू आहे. त्यासंदर्भात एक चांगला निर्णय घेतील अशी आम्ही प्रार्थना करतो. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने काय केलं, अनेक सरकार ही काँग्रेस पक्षाने पाडलीय, राजकारणात ह्या गोष्टी अपरिहार्य आहे असेही ते म्हणाले,

धोनीने शिवसेनेत यावे
श्री.राऊत म्हणाले, महेंद्र सिंग धोनी भाजप मध्ये जाणार का ? असं विचारलं तर मी ऐकलं ते शिवसेनेत येणार आहे
 माझ्याकडे अशी माहिती आहे की त्यांना खरं म्हणजे शिवसेनेत यायचे आहे. धोनी संवेदनशिल खेळाडू आहे. संवेदनशील व्यक्तींचं राजकारणात स्वागत केलं पाहिजे.  खेळाडू, सैनिक आणि कलावंत यांना शक्यतोवर कुठल्याही वादामध्ये ओढू नये,असे त्यांनी नमूद केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sanjay raut