BATTLE FOR NASHIK-भाजपने बंडखोरी करणाऱया कोकाटेंवर कारवाई करावी-संजय राऊत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 एप्रिल 2019

नाशिकः नाशिक लोकसभा मतदार संघात माणिकराव कोकाटे यांची बंडखोरी ही भाजपच्या विरोधात आहे. त्यांच्यावर भाजपने कारवाई करावी असे शिवसेना नेते संजय राऊत यांनी युतीच्या संयुक्त मेळाव्यापूर्वी पत्रकारांना सांगितले. ते म्हणाले, कोकाटे यांनी ताकद अजमावून पहावी. 2०१४ पेक्षा मोठा निर्णय यंदा लागेल.महाराष्ट्राच्या पाठिंब्यावर दिल्लीची सत्ता नक्कीच काबीज करू,नाशिकमध्ये खासदार रिपीट होत नाही ही अंधश्रद्धा असून आमचा खासदार रिपीट होईल.मनसेचा बालेकिल्ला कधीच ढासळला आहे.हे विसरू नये

   गोडसे यांच्या प्रचार कार्यालयांना भेटी देवून खासदार राऊत यांनी प्रचाराचे नियोजन समजून घेतले. सातपूर येथील प्रचार कार्यालयाच्या उदघाटनानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. नाशिक हा हिंदुत्वाचा बालेकिल्ला असून शिवसेनेसाठी येथे पोषक वातावरण आहे. नाशिककर मतदार हुशार आहे. नाशिक ही क्रांतीकारक व साहित्यिकांची भुमी आहे. त्यामुळे हिन्दुत्वाचा बालेकिल्ला असलेला येथील मतदार हा शिवसेनेच्या पाठीशी उभा राहील. सन 2014 मध्ये हेमंत गोडसे यांना मिळालेल्या मतदारनापेक्षा अधिक मतदान यंदाच्या निवडणुकीत होईल असा दावा त्यांनी केला. 

कोकाटेंची भुमिका शिवसेनेविरोधात 
सिन्नरचे माजी आमदार ऍड. माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करून शिवसेनेने विरोधात बंडखोरी केली आहे. कोकाटे यांनी ताकदं अजमावून पाहावीचं असे सांगताना त्यांची बंडखोरी मोदींविरोधात असल्याने भाजपने कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली. 
 
Web Title: marathi news SANJYA RAUT