कावडधारकांनी सप्तश्रृंगी गड गजबजला,

residentional photo
residentional photo

                                    
वणी : पायातील घुंगराची छमछम, सप्तश्रृंगी मातेचा जयघोष, ढोल ताशांचा गजर, व डीजेवरील देवीच्या गाण्यांनी सप्तश्रृंगी गडाकडील रस्ते निनादून गेले असून कावडीधारक व  पदयात्रेकरुंच्या गर्दीने गडाकडे येणारे रस्ते भगवामय झालेे आहे. दरम्यान उद्या, ता. १३ कोजागिरी पौर्णिमा (अश्विन पौर्णिमा) उत्सव व कावड यात्रा सप्तशृंगी गडावर संपन्न होत असून त्यादृष्टीने प्रशासकीय यंत्रना सज्ज झाली आहे. 
     आदिशक्ती सप्तश्रृंगी मातेच्या कोजागिरी पौर्णिमा निमित्त अभिषेक विधी करण्यासाठी हजारो कावडीधारक पूणे येथून मुळा नदीचे, साक्री, पिंपळनेर, शहादा, असलोदा, त्र्यंबकेश्वर येथून कुशावर्ताचे व नाशिक पंचवटी येथून रामकुंडातून गोदावरीचे, कसमादे भागातील मोसम, गिरणा नदीचे जल (तीर्थ) घेवून गडावर  आदी ठिकाणाहून तापीचे, ओंकारेश्वर, इंदुर येथून नर्मदेचे, उज्जेन येथून क्षिप्रा नदीचे तीर्थ, त्र्यंबकेश्वर येथून कुशावर्ताचे व नाशिक पंचवटी येथून रामकुंडातून गोदावरीचे, कसमादे भागातील मोसम, गिरणा नदीचे जल (तीर्थ) घेवून गडावर आदी ठिकाणांहून चारशे ते सहाशे किमी अंतरावरुन अनवाणी प्रवास करुन कोजागिरीच्या पूर्वसंध्येस वणी गांव व सप्तश्रृंगी गड व  परीसरात दाखल झाले आहे.

   कावडीधारक व पदयात्रेकरुंच्या गर्दीने नाशिक - वणी, कळवण - नांदुरी रस्ता भगवामय झाला  रस्त्याला दिंडीचे स्वरूप प्राप्त झाले अाहे. वणी गावातील जगदंबा मातेचे दर्शन घेवून काही कावडीधारक सप्तश्रृंगी गडावर रवाना होत आहे तर वणी पाच हजारांवर कावडीधारक व पदयात्रेेकरु मुक्कामी थांबले आहेत. येथील जगदंबा मंदीराचा सभागृह, सांस्कृतिक सभागृह येथे निवास व विश्रांतीची सोय करण्यात आलेली असून मिळेल त्या ठिकाणी कावडीधारक विश्रांती घेत होते. कावडीधारकांमध्ये महिलांची संख्याही मोठया प्रमाणात आहे. नाशिक व कळवण बाजुकडून रस्ता कावडीधारकांच्या गर्दीने ओसंडून वाहात असल्याने मार्गावरील वाहाने संथ गतीने धावत होते. नाशिक वणी रस्त्यावर व वणी गावात ठिकठिकाणी स्वयंसेवी मंडळतर्फे कावडीधारक व पदयात्रेकरूंना फराळ, दुध, नाष्टा, सरबत व पिण्याच्या पाण्याची सुविधा व रात्री महाप्रसादाची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली होती. दरम्यान उदया ता. १३ पहाटे पाच वाजता येथील जगदंबा मातेस कावडीधारकांनी आणलेल्या एका गडव्यातील पवित्र जलाने जलाभिषेक करण्यात येणार असून त्यानंतर कावडीधारक गडाकडे प्रस्थान करतील. 

   उदया सकाळी सप्तश्रृंगीगडावर सकाळी 7 वा. न्यासाच्या कार्यालयातून देवीच्या अलंकाराची सवादय मिरवणूक निघणार असून सकाळी ७ ते ९ वाजे पर्यंत देवीची पंचामृत संपन्न होणार आहे. दुपारी १२ वा देवीची नैवदय आरती व सांयकाळी ७ वा. वाजता ‘शांतीपाठाने देवीच्या कोजागिरी उत्साहास प्रारंभ होईल. दुपारी १२  वाजेपासून कावडीधारकांना व्हीआयपी गेटमधुन मंदीरात सोडण्यात येणार आहे.  रात्री ८ पर्यंत  कावडीधरकांनी आणलेले पवित्र नदयांचे जल कावडीधारक स्वत: जलाभिषेेकासाठी ठेवण्यात आलेल्या दहा ते पंधरा पिंपामध्ये ओतील व त्यानंतर ११ पुरोहित लाखो भाविकांच्या उपस्थीत सप्तश्रृंगीचा जलाभिषेक करण्यात येणार आहे.

    कोजागीरी उत्साहाचे भाविकांचे खास आकर्षन असलेल्या किन्नरांची दिक्षा कार्यक्रमा बरोबरच शेकडो किन्नरांच्या उपस्थितअसणारी छबिना मिरवणूक निघणार अाहे. त्यादृष्टीन किन्नरांचे वेगवेगळे गट गडावर दाखल झाले असून सकाऴ पर्यंत दाखल होत आहे. कावडीधारक व यात्रेकरूंना पिण्याचे पाणी, निवास व इतर कार्यक्रमांसाठी न्यासााची तयारी पूर्ण झाली असून भाविकांना प्रसादालयात सकाळी ११ ते रात्री ११ पर्यंत मोफत महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

क़डेकोट बंदोबस्त अन् ५० बसेस

कोजागिरीच्या पूर्वसंध्येस गडावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. आज मध्यरात्रीपासून नांदुरी सप्तश्रृंगी रस्ता खाजगी वाहानांसाठी बंद करण्यात येणार असल्याने कावडीधारकांची साहित्य असलले हजारो वाहाने तत्पूर्वीत गडावर दाखल झाल्याने गडावर वाहानांची मोठी गर्दी झाली आहे. दरम्यान आज मध्यरात्री पासून नांदुरी - सप्तश्रृंगी गड या दरम्यान फक्त राज्य परीवहन महामंडाच्या बसेस वाहतूक करणार असल्याने  ५० बसेस भाविकांच्या वाहतूकीसाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. नवरात्रोत्सवा दरम्यानचीच आरोग्य, पाणीपूरवठा, स्वच्छता, पोलिस यंत्रणा कायम ठेवण्यात आल्या असून आज रात्री पासूनच सर्व यंत्रणा कार्यान्वीत होत आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com