सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी 258 बस भाविकांच्या सेवेत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

नाशिक : नवरात्रोत्सवाला येत्या रविवार (ता.29) पासून सुरवात होत आहे. साडेतीन शक्‍तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीच्या दर्शनासाठी नवरात्रोत्सव काळात मोठी गर्दी होते. या पार्श्‍वभूमीवर गडावर जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने 258 जादा बसगाड्यांचे नियोजन केले आहे. खासगी वाहनाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दरवर्षीप्रमाणे यंदाही नांदुरी पायथ्यापासून बसगाडीने प्रवास करावा लागण्याची शक्‍यता आहे. 

गडाकडे जाणारा घाटाचा रस्ता लक्षात घेता, खासगी वाहनांना या कालावधीत नांदुरी पायथा येथून बंदी घालण्यात येत असल्याने दर्शनासाठी भाविकांना बसगाडीनेच प्रवास करावा लागत असतो. महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळातर्फे आगारनिहाय बसफेऱ्यांचे नियोजन केले आहे
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news saptshrungi ghad yatra