सापुतारा-वणी रस्त्याच्या कामांसाठी धमकीवजा पत्राने खळबळ

live
live

 लखमापूर:- सापुतारा - वणी - पिंपळगाव रस्त्याच्या कामासाठी आवश्‍यक गौण खनिज वाहतूक बंद करा अन्यथा खराब झालेले रस्ते आम्ही दुरुस्त करणार नाही. असा थेट धमकीवजा इशारा सार्वजनिक बांधकाम विभाग दिंडोरी च्या उपअभियंत्यांनी दिला आहे. त्यामुळे बोपेगाव, सोनजांब, मावडी या ग्रामपंचायत सरपंच चांगलेच धास्तावले आहे. हा एक प्रकारे शासकीय काम बंद पाडण्यासाठी जनतेला चिथावणी देण्याचा प्रकार असून याची चौकशी करण्याची मागणी बोपेगाव च्या सरपंच सौ. वैशाली कावळे यांनी केली आहे. 

सापुतारा - पिंपळगाव राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून त्यासाठी बोपेगांव येथील पाझर तलावातून मुरूम उत्खनन करून त्याची बोपेगाव, सोनजांब, तळेगाव या परिसरातून वाहतूक सुरू आहे. यामुळे या पाझर तलावाची पाणी साठवण क्षमता वाढणार असून जलसंधारण विभागाच्या शासन निर्णानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाने या पाझर तलावातून माती अथवा मुरूम दगड आदी गौण खनिज उत्खनन करून वाहतूक करण्यासाठी परवानगी दिली आहे. 
या अवजड वाहतुकीमुळे परिसरातील रस्ते खराब होत आहे ही वस्तुस्थिती आहे त्यासाठी शासकीय पातळीवरून निधी उपलब्ध करून हे रस्ते दुरुस्त करणे अपेक्षित असताना सार्वजनिक बांधकाम विभागाने या परिसरातील ग्रामपंचायतींना पत्र पाठवून ही वाहतूक तत्काळ बंद करावी अ न्य था या खराब झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार नाही असा थेट इशाराच दिला आहे. विशेष बाब म्हणजे या उत्खनन व वाहतुकीसाठी जिल्हाधिकारी नाशिक यांची परवानगी असताना शासकीय कामासाठी सुरू असलेली वाहतूक जर बेकायदेशीर असेल तर संबंधित विभागाने कारवाई करून ही वाहतूक बंद करणे अपेक्षित असताना ग्रामपंचयतीमार्फत ही वाहतूक बंद करण्याची अपेक्षा ठेवण्याचे कारण काय असा प्रश्न सरपंच सौ. कावळे यांनी उपस्थित केला आहे. 
    जर रस्ते देखभाल दुरुस्ती चे काम सार्वजनिक बांधकाम उपविभाग क्रमांक च्या अंतर्गत येते तर मग या विभागाने रीतसर कारवाई करून ही वाहतूक बंद करणे अपेक्षित आहे.मात्र या विभागाने आपली जबाबदारी ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्यावर ढकलून तुम्ही तुमच्या स्तरावरून हो वाहतूक बंद करा अर्थात संबंधित राष्ट्रीय महामार्गाचे काम बंद करा अ न्यथा यामुळे खराब होणारे रस्ते आम्ही दुरुस्त करणार नाही किंवा त्यासाठी निधी उपलब्ध करून देणार नाही अशी अनाकलनीय भूमिका घेण्याचे खरे कारण काय? हा सवाल उपस्थित झाला आहे. 

सापुतारा वणी पिंपळगाव या रस्त्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून सुरू असून त्यासाठी आवशक साहित्य वाहतुकीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे रस्ते खराब होत आहेत. रस्ते दुरुस्ती करणे बांधकाम विभागाला शक्‍य होणार नाही त्यामुळे ग्रामपंचायतींनी संबधित वाहतूक बंद करण्यासाठी सहकार्य करावे यासाठी विनंती करण्यात आली आहे. 
दिलीप भामरे 
उपविभागीय अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग दिंडोरी उपविभाग क्रमांक 

परिसरातील रस्ते आधीच शेवटची घटका मोजत असताना ते दुरुस्त करण्यासाठी शासनाकडे निधी ऊपलब्ध करून मिळावा यासाठी प्रयत्न करण्याऐवजी सुरू असलेले काम बंद करण्यासाठी परिसरातील सरपंचांच्या माध्यमातून जनतेला प्रवृत्त करण्याचा प्रयत्न शासकीय अधिकाऱ्यांनी च करावा हे अनाकलनीय असून याची सखोल चौकशी व्हावी 
सौ. वैशाली कावळे 
सरपंच बोपेगाव 

 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com