रिमझिम पावसाच्या सरींनी सातपुडा परिसर बहरला; निसर्ग रम्यस्थळे खुणावताहेत पर्यटकांना 

रिमझिम पावसाच्या सरींनी सातपुडा परिसर बहरला; निसर्ग रम्यस्थळे खुणावताहेत पर्यटकांना 

सारंगखेड ः श्रावणात बरसणाऱ्या रिमझिम पावसाच्या सरींनी सातपुड्याच्या कुशीतील निसर्ग रम्य स्थळांना नैसर्गिक सौंदर्य प्राप्त करून दिले असून हिरवा शालू पांघरलेल्या धडगाव (जि. नंदूरबार) परिसरातील मोहक रुप आता पर्यटकांना खुणावत आहे. मात्र कोरोनामुळे रम्य स्थळे सुनीसुनी झाली आहेत. 

श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे या कवितांप्रमाणे हिरवा शालू पांघरून नव्या नवरी प्रमाणे नटलेल्या धडगाव (जि. नंदूरबार) च्या सातपुडा पर्वताचे निसर्ग सौंदर्य बघून मनाला मंत्रमुग्ध करत असले, तरी कोरोनाचा संसर्गामुळे पर्यटकांना याचा आनंद घेता येत नाही. 

धबधबा पर्यटकांचे आकर्षण 
बिलगाव (ता. धडगाव) येथील नर्मदा नदीच्या पाण्यावरील तयार झालेल्या धबधबा ही धो धो करून कोसळत आहे. हा धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी दरवर्षी होते. येथे होत असलेल्या पावसामुळे धबधबा ओसांडून वाहू लागला असून तेथील सौंदर्यात अधिक भर पडली आहे . 

निसर्गरम्य स्थळे सुनीसुनी 
कोरोनाचे संकट आले आणि सर्वच मैफली सुनी सुनी झाली. यंदाचा पावसाचा रंग बेरंग झाला आहे. पावसाळ्यात आपोआप तरुणाईची पावले निसर्गरम्य पर्यटनस्थळांकडे वळतात. खानदेशातील प्रमुख निसर्ग रम्यस्थळ म्हणून धडगावकडे पाहीले जाते. दरवर्षी पर्यटक सातपुड्याच्या कुशीतील निसर्ग रम्य स्थळांना भेटी देतात. जवळच गुजरात, मध्य प्रदेश राज्य असल्याने यां राज्यातील पर्यटकांची संख्या वाढलेली असते. मात्र यंदा कोरोनाच्‍या महामारीमुळे ही स्थळे सुनीसुनी असून तरुणाईच्या आनंदावर विरजण पडले आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com