esakal | घोड्यांच्या टापांचा आवाज येईल अन्‌ नाचतील; महोत्‍सव आयोजनाची अपेक्षा
sakal

बोलून बातमी शोधा

sarangkheda chetak festival

डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा बाजार प्रारंभ होतो. त्यामुळे या वर्षी सुद्धा अश्‍व दाखल होतील आणि त्यांच्या टापांचे आवाज गुंजतील अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना लागून आहे.

घोड्यांच्या टापांचा आवाज येईल अन्‌ नाचतील; महोत्‍सव आयोजनाची अपेक्षा

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : चारशे वर्षापासून असलेली अश्व बाजाराची परंपरा यावर्षी खंडित होऊ नये; तसेच कोरोनाची विघ्नदृष्ट या परंपरेला लागू नये यासाठी येथील प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. डिसेंबर महिन्याच्या थंडीच्या गारव्यात सारंगखेडा परिसरात घोड्यांच्या टापांचा आवाज निनादू लागतात. देशाच्या विविध प्रांतातून अश्व विक्रेते दाखल होत असतात. सध्या शासनाने आठवडे बाजारला परवानगी दिली असल्याने अश्व बाजार देखील त्याच पार्श्वभूमीवर भरला जाऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा बाजार प्रारंभ होतो. त्यामुळे या वर्षी सुद्धा अश्‍व दाखल होतील आणि त्यांच्या टापांचे आवाज गुंजतील अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना लागून आहे.

देशात अश्व बाजारासाठी सारंगखेडा (ता. शहादा) येथील एकमुखी दत्त यांची यात्रा प्रसिद्ध आहे. विविध राज्यांतील उमदे व देखणे घोडे हे यात्रेचे मुख्य आकर्षण असते. या व्यतिरिक्त विविध शेतीपयोगी साहित्यांची देखील मोठी रेलचेल पहावयास मिळते. जोडीला काही वर्षापासून सुरू असलेल्या चेतक फेस्टिव्हलला मोठा प्रतिसाद लाभत आहे. महत्वाचे हिवाळी पर्यटनस्थळ म्हणून सारंगखेडा पुढे येत आहे. ग्रामीण कला, संस्कृती आणि शेती अर्थव्यवस्थेला चालना देणारा उत्सव म्हणून या यात्रेकडे पाहिले जाते. यंदा ही असाच मोठा उत्सव साजरा झाला असता मात्र कोरोनाचा प्रादूर्भावामुळे चेतक फेस्टिव्हलची अद्याप तयारी नसल्याचे दिसते. येथील अश्व बाजाराला चारशे वर्षाची परंपरा आहे. ती खंडीत होऊ नये यासाठी प्रयत्न सुरु आहेत. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अश्व बाजार प्रारंभ होत आहे. घोड्यांच्या टांपाचा आवाज परिसरात गुंजतील अशी अपेक्षा या भागातील नागरिकांना करीत आहेत.

अश्व बाजारामुळे शेकडोंना रोजगार...
दरवर्षी डिसेंबर महिन्यात भरणाऱ्या येथील अश्व बाजारात 14 राज्यातील व्यापारी अश्वांच्या खरेदी विक्रीसाठी येतात. दोन हजाराहून अधिक अश्व विक्रीला येतात व. त्यांना या भागातील मजूर वर्ग चारा, खाद्य उपलब्ध करतात. या बाजारात चहा, नाश्तां, हॉटेल्स, जेवनावळ, थंडपेय विक्रेते, चने-फुटाणे शेंगदाणे, अंडी, किराणा, खोगीर विक्रेते आदींना रोजगार उपलब्ध होतो. या सर्वांचा विचार करता नियमांचे बंधन टाकत अश्व बाजार भरण्याची नितांत गरज आहे. प्रशासनही यादृष्टीने सकारात्मक विचारातून बाजाराला परवानगी देतील अशी आस स्थानिक विक्रेत्यांना लागून आहे.

संपादन ः राजेश सोनवणे
 

loading image
go to top