पाणी व साबणाने स्वच्छ व्हा मगच गावात प्रवेश 

sarangkheda village
sarangkheda village

सारंगखेडा : प्रवेश द्वाराजवळ हात पाय साबनाने स्वच्छ धुऊनच गावात प्रवेश मिळेल, यासाठी सारंगखेडा ग्रामपंचायतीने प्रवेश द्वाराजवळ पाणी व साबणाची व्यवस्था केली आहे. दरम्यान गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांना सॅनिटायझर केली जात आहे. एकंदरीत गावाने स्वच्छतेतुन कोरोनावर मात करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोनाचा धसका संपूर्ण जगाने घेतला आहे. या विषाणूचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी माणसाचे आयुष्यच बदलून टाकले आहे. कोरोनाने मानवास जीवन जगण्याचा खरा मार्ग दाखवला. दैनंदिन जगत असलेल्या जीवनात आमूलाग्र बदल घडून नवे विचार मानवी जीवनावर झाले आहेत. माणसातील पद, पैसा, प्रतिष्ठा,  गर्व, मीपणा, स्वार्थी वृत्ती या कोरोनाने धुळीस मिळवत केवळ माणूस म्हणून जगायला शिकवले. स्वच्छ भारत योजनेसाठी शासनाने कोटी रुपये खर्च केले तरीही जागोजागी अस्वच्छता दिसून आली. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सारंगखेडा येथील ग्रामपंचायत व ग्राम सुरक्षा रक्षकांनी दखल पात्र निर्णय घेतला असून बाहेर गावाहून येणाऱ्यान साठी गाव प्रवेशाजवळ पाण्याचा टँकर उभा केला असून सोबत साबन ठेवले आहेत. हात, पाय स्वच्छ धुऊनच गावात प्रवेश करावा. अन्यथा गावात प्रवेश नाही. तसेच प्रवेश द्वाराजवळ दोन कर्मचारी गावात येणारी प्रत्येक वाहनांवर सॅनिटायझर केली जात आहे. तसेच गावात मास्क लावलेल्या व्यक्तीलाच प्रवेश दिला जातो. बाहेरुन आलेल्या व्यक्ती का कामासाठी गावात आला आहे. याची चौकशी करूनच गावात प्रवेश दिला जात आहे. मास्क न लावलेल्या व्यक्तीला एक हजार रुपये दंड आकारणी केली जाते.

आरोग्याबाबत वाढली सजगता
आरोग्याकडे कमालीचे दुर्लक्ष करणारे अनेकजण कोरोनामुळे आता सजग झाले आहेत. आरोग्याबाबत जागृती करण्यासाठी येणाऱ्या आरोग्य कर्मचारी, आशा सेविका यांचा सल्ला ग्रामस्थ गंभीरपणे ऐकत आहेत. वेळोवेळी हात धुणे, दररोज स्वच्छ कपडे घालणे, अंघोळकरणे, मास्क वापरणे आदी गोष्टीही आरोग्याच्या दृष्टीने केल्या जात आहेत.

गावात स्वच्छता सुरूच असते. घंटागाडीही सतत सुरू असते. ग्रामस्थांनाही आता कोरोना रोगामुळे स्वच्छतेचे महत्व पटले आहे. शिवाय ग्रामपंचायतीतर्फे ही धूर फवारणी सह स्वच्छतेलाच अधिक महत्व दिले जात आहे.
- सुशिलाबाई मोरे, सरपंच .

कोरोनामुळे आरोग्याचे महत्व कळाले. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सर्व सुविधांयुक्त असावी याची जाणीव झाली. पुढील काळात ग्रामीण भागातील आरोग्य सेवा सक्षम कशी करता येईल याबाबत लक्ष राहणार आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव टाळण्यासाठी प्रत्येक जणांनी सॅनिटायझर चा वापर करावा किंवा साबनाने हात स्वच्छ धुणे. तोंडाला मास्क लावणे याचे नियम पाळावे.
- जयपालसिंह रावल, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद .नंदूरबार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com