सटाण्यात दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय स्पर्धा संपन्न

satana
satana

सटाणा : दिव्यांग विद्यार्थी अभ्यासासोबत क्रीडाक्षेत्रातही प्रगती करू शकतात. मैलाचा दगड गाठू शकतात. फक्त त्यांना एका संधीची आवश्यकता असते. शिक्षकांनी दिव्यांग विद्यार्थ्यांना ती संधी निर्माण करून दिली तर त्यातून त्यांचा निश्चितच सर्वांगीण विकास होईल, असे प्रतिपादन बागलाणचे गटशिक्षणाधिकारी साहेबराव बच्छाव यांनी आज गुरुवारी (ता. 25) येथे केले. 

येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सर्व शिक्षा अभियान समावेशित शिक्षण अंतर्गत बागलाण पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे तालुक्यातील इयत्ता पहिली ते आठवीतील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या तालुकास्तरीय स्पर्धेचे उद्घाटन बच्छाव यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षणविस्तार अधिकारी पी.आर.जाधव, के.पी.जाधव, टी.के.घोंगडे, के.एन.विसावे, केंद्रप्रमुख हेमलता धोंडगे आदी उपस्थित होते. सामान्य मुलांबरोबर दिव्यांग विद्यार्थ्यांनाही शिक्षणाची समान संधी उपलब्ध व्हावी, त्यांच्यात दडलेल्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी अशा स्पर्धांचे आयोजन केले जात असल्याचे विस्तार अधिकारी पी.आर.जाधव यांनी स्पष्ट केले. 

स्पर्धेत तालुक्यातील अल्पदृष्टी, मतीमंद, कर्णबधीर, अस्थिव्यंग, सेरेब्रल पाल्सी आदी प्रकारच्या अपंगत्व असलेल्या विद्यार्थ्यांसाठी 50 व 100 मीटर धावणे, चमचा लिंबू, संगीत खुर्ची, बादलीत चेंडू टाकणे आदी स्पर्धा घेण्यात आल्या. क्रीडाशिक्षक सी.डी.सोनवणे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. स्पर्धा यशस्वीतेसाठी आर.पी.गायकवाड, सोमीनाथ फड, राजेश ठेंगे, ज्ञानेश्वर सोनवणे, किरण निकुंभ, राजेंद्र शेवाळे आदींसह सर्व शिक्षा अभियानाचे सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.

स्पर्धेचा प्रकार व प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे -
50 मीटर धावणे - लहान गट : ओमकार सोनवणे (पिंपळेश्वर), ऋतुजा खैरनार (कोटबेल)
100 मीटर धावणे - मोठा गट : १०० मिटर धावणे - किरण चौरे (सटाणा), रोहिणी पवार (वीरगाव)
चमचा लिंबू - लहान गट : कृष्णा सोनवणे (कोटबेल), माधुरी जाधव (मुंजवाड) 
मोठा गट : ओम सोनवणे (प्रगती शाळा, सटाणा), धनश्री कापडणीस (जिजामाता हायस्कूल, सटाणा)
बादलीत चेंडू टाकणे - लहान गट : विवेक खैरनार (सटाणा मुले), काजल खैरनार (मुंजवाड) मोठा गट : राजेंद्र अहिरे (मराठा हायस्कूल, सटाणा), तेजल अहिरे (जिजामाता, सटाणा).
संगीत खुर्ची - लहान गट : श्लोक सोनवणे (सटाणा), ऋतुजा खैरनार (कोटबेल)
 मोठा गट : ओम सोनवणे (प्रगती शाळा, सटाणा), मुस्कान शेख (सटाणा उर्दू शाळा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com