देवमामलेदारांच्या परंपरेनुसार सामाजिक बांधिलकीने न्यायदानाचे काम सुरु

रोशन खैरनार
शुक्रवार, 12 जानेवारी 2018

सटाणा : बागलाण तालुक्यास देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांची महान परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेला अधीन राहूनच आज सामाजिक बांधिलकीने न्यायदानाचे काम सुरु आहे. जनतेने किरकोळ स्वरूपाच्या भांडणात वेळ व पैसा वाया न घालविता लोकन्यायालयात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी येथे केले. 

सटाणा : बागलाण तालुक्यास देवमामलेदार श्री यशवंतराव महाराजांची महान परंपरा लाभलेली आहे. त्या परंपरेला अधीन राहूनच आज सामाजिक बांधिलकीने न्यायदानाचे काम सुरु आहे. जनतेने किरकोळ स्वरूपाच्या भांडणात वेळ व पैसा वाया न घालविता लोकन्यायालयात सहभागी व्हावे, असे आवाहन नाशिक जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांनी येथे केले. 

येथील न्यायालय आवारात बागलाण वकील संघ व सटाणा न्यायालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित गुणगौरव व सत्कार समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सटाणा प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी पवनकुमार तापडिया तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा विधी प्राधिकरणाचे सचिव सुधीरकुमार बुक्के, सहन्यायाधीश विक्रम आव्हाड, महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयंत जायभावे, नाशिक वकील संघाचे अध्यक्ष अॅड. नितीन ठाकरे, बागलाण वकील संघाचे अध्यक्ष अॅड. पंडितराव भदाणे, सरकारी वकील व्ही.टी.बोराळे आदी उपस्थित होते. 

शिंदे म्हणाले, यापूर्वी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत नाशिक जिल्ह्याने देशात प्रथम क्रमांक मिळविला आहे. तीच परंपरा कायम कायम ठेवण्यासाठी येत्या १० फेब्रुवारी रोजी आयोजित राष्ट्रीय लोकअदालतीत बागलाणच्या जनतेने सहभागी व्हावे. अॅड. भदाणे, अॅड. जायभावे, अॅड. ठाकरे आदींची भाषणे झाली.
 
बागलाण वकील संघातर्फे अध्यक्ष अॅड. भदाणे यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते जिल्हा न्यायाधीश शिंदे व मान्यवरांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. नाशिक वकील संघाचे सदस्य अॅड. हर्षल केंगे, अॅड. महेश लोहिते, अॅड. शरद मोगल, अॅड.कमलेश पाळेकर, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड.डी.जी.क्षीरसागर, अॅड.एम.आर.भामरे, लोकन्यायालयात अधिकाधिक खटले निकाली काढण्यात उल्लेखनीय काम करणारे अॅड.संजय सोनवणे, अॅड.प्रकाश गोसावी तसेच नाशिक वकील संघातर्फे आयोजित क्रिकेट स्पर्धेत यश मिळविणारे अॅड.निलेश डांगरे, अॅड.यशवंत पाटील, अॅड.प्रणव भामरे आदींना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. 

कार्यक्रमास अॅड.सतीश चिंधडे, अॅड.सी.एन.पवार, अॅड.अभिमन्यू पाटील, अॅड.सोमदत्त मुंजवाडकर, अॅड.रवींद्र पाटील, अॅड.नितीन चंद्रात्रे, अॅड.एस.एस.शिंदे, अॅड.के.पी.भदाणे, अॅड.सी.एन.अहिरे, अॅड.व्ही.बी.सोनवणे, अॅड.टाटीया, अॅड.मधुकर सावंत, अॅड.मनीषा ठाकूर, अॅड.के.के.देवरे, अॅड.पाठक, अॅड.स्मिता चिंधडे, अॅड.सरोज चंद्रात्रे, सहाय्यक अधीक्षक अशोक आहेर, लघुलेखक नंदलाल अहिरे, अजय पगार आदींसह नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. अॅड.रेखा शिंदे व अॅड.नाना भामरे यांनी सूत्रसंचालन केले. तर अॅड.सोमदत्त मुंजवाडकर यांनी आभार मानले.

Web Title: Marathi news satana news judiciary system