सटाण्यात पालिका कर्मचारी संघटनेतर्फे एकदिवसीय धरणे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

सटाणा : राज्यातील सर्व नगरपरिषद कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा तसेच कायम व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाचा फरक मार्च २०१८ अखेर द्यावा यांसह इतर विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र नगरपालिका कामगार सिटू संलग्न कर्मचारी संघटनेतर्फे येथील पालिकेच्या प्रवेशद्वारात एकदिवसीय धरणे आंदोलन छेडण्यात आले. शासनाने मागण्या मान्य न केल्यास राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला.

पालिका प्रवेशद्वारात पालिका कर्मचाऱ्यांनी शासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करून धरणे आंदोलनास सुरुवात केली. यावेळी संघटनेतर्फे मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात, कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, कायम व निवृत्त कर्मचाऱ्यांच्या सहाव्या वेतन आयोगाचा फरक मार्च २०१८ अखेर द्यावा, कर्मचाऱ्यांना वेतन वेळेवर मिळावे यासाठी सहाय्यक वेतन अनुदान देण्याचा निर्णय शासनाने घेतला. मात्र दोन दोन महिने उलटूनही वेतन मिळत नाही.

प्रत्येक महिन्याच्या १ तारखेस सहाय्यक वेतन अनुदानाची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यांवर ऑनलाइन पद्धतीने जमा करावी. जिल्हा परिषद व पंचायतस अमितीप्रमाणे पालिकांमधील कायम व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे वेतन व पेन्शनवर १०० टक्के अनुदान द्यावे, अनुकंपाधारकांच्या भरतीबाबत जाचक अटी शिथिल करून  विना अट व विना शर्त त्यांना कामावर नियुक्ती द्यावी, आकृतिबंधानुसार रिक्त पदे भरली जावी, अग्निशमन विभागातील रिक्त पदे भरण्याबाबत स्वतंत्ररित्या कार्यवाही करावी, चतुर्थ श्रेणीतील सफाई कर्मचाऱ्यांप्रमाणेशिपाई, वॉचमेन, कामाठी, कुली यांच्या वारसांना पूर्वीप्रमाणे विशेष बाब योजनेखाली नोकरीत सामावून घ्यावे यांसह इतर विविध प्रलंबित मागण्या निवेदनात नमूद करण्यात आल्या आहेत. शासनाने या मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन त्या तात्काळ सोडवाव्यात. अन्यथा एप्रिल महिन्यात राज्यातील सर्व पालिकांचे कामकाज बंद पाडून राज्यव्यापी कामबंद आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे.

आंदोलनात संघटनेचे उत्तर महाराष्ट्र सरचिटणीस पोपटराव सोनवणे, शाखा अध्यक्ष सुभाष पाटील, सचिव अनिल सोनवणे, माधव मेणे, सुनील सोनवणे, विजय सोनवणे, पाणीपुरवठा अधिकारी संजय सोनवणे, बांधकाम अधिकारी शालीमार कोर, किशोर सोनवणे, आनंदा सोनवणे, के.जी.केदारे, अजय पवार, मोहन सोनवणे, दीपक सोनवणे, गौरव शिंदे, प्रभाकर खैरनार आदींसह कर्मचारी सहभागी झाले होते.

Web Title: Marathi news satana news municipal corporation employees union agitation