शिवसेना बागलाण विधानसभा संपर्कप्रमुख प्रशांत सातपुतेंची सटाणा येथे भेट

रोशन खैरनार
मंगळवार, 13 मार्च 2018

सटाणा : शिवसेनेचे बागलाण विधानसभेचे संपर्कप्रमुख प्रशांत सातपुते यांनी आज मंगळवारी (ता.१३) येथे अचानक भेट देऊन ट्रामा केअर युनिट (उपजिल्हा रुग्णालय), ग्रामीण रुग्णालय व सटाणा बसस्थानकाची पहाणी केली. यावेळी सातपुते यांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत शिवसेनेच्या माध्यमातून शासनस्तरावर त्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

सटाणा : शिवसेनेचे बागलाण विधानसभेचे संपर्कप्रमुख प्रशांत सातपुते यांनी आज मंगळवारी (ता.१३) येथे अचानक भेट देऊन ट्रामा केअर युनिट (उपजिल्हा रुग्णालय), ग्रामीण रुग्णालय व सटाणा बसस्थानकाची पहाणी केली. यावेळी सातपुते यांनी सर्वसामान्य जनतेशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेत शिवसेनेच्या माध्यमातून शासनस्तरावर त्यांची सोडवणूक करण्याचे आश्वासन दिले.

आज सकाळी ११ वाजता येथील ट्रामा केअर युनिट (उपजिल्हा रुग्णालय) मध्ये सातपुते यांचे आगमन झाले. शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, माजी तालुकाप्रमुख अरविंद सोनवणे, अनिल सोनवणे, ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हाप्रमुख आनंदा महाले, शरद शेवाळे आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजाराम सैन्द्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ.पंकज शिवदे व डॉ.शशिकांत कापडणीस यांनी सातपुते यांचे स्वागत केले. यावेळी बोलताना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे यांनी प्रशासनाने रुग्णांसाठी ट्रामा युनिटमध्ये पोट्रेबल डिजिटल एक्सरे मशीन बसवावे, रुग्णांना उच्च दर्जाची वैद्यकीय सुविधा मिळाव्यात यासाठी सध्या फक्त मालेगावपर्यंतच जात असलेली १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका थेट नाशिकपर्यंत जावी तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणाचे अत्यंत धीम्या गतीने सुरु असलेले काम तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली.

दरम्यान, सातपुते यांनी सटाणा बसस्थानकासही भेट दिली. महामंडळाने सटाणा - पुणे शिवशाही बससेवा सुरु केली असली तरी आगारातून सटाणा - मुंबई ही बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. महामंडळाने विनाविलंब ही बससेवा सुरु करून प्रवाशांना दिलासा द्यावा अशी मागणी शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांनी केली.

संपर्कप्रमुख सातपुते यांनी आगारातील चालक, वाहक व प्रवाशांच्या समस्यांची माहिती घेतली. प्रवाशांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध करावी आणि त्यांना भेडसावणार्या सर्व समस्या सोडविण्याच्या सूचना श्री.सातपुते यांनी आगार व्यवस्थापक उमेश बिरारी यांना केल्या. तसेच शहरातील ट्रामा केअर युनिटच्या समस्यांचा अहवाल आरोग्यमंत्री डॉ.दीपक सावंत यांच्याकडे सादर करणार असून त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी अस्थिरोगतज्ञ डॉ. ए. ए. नायाबी, डॉ. नामदेव बांगर, तालुका संघटक मुन्ना सोनवणे, कारभारी पगार, आनंदा लाडे, सुभाष खैरनार, कैलास भामरे, सचिन सोनवणे, राजनसिंह चौधरी, लक्ष्मण सोनवणे, वसंत सोनवणे, हेमंत गायकवाड, दिलीप शेवाळे, किरण मोरे, बाजीराव देवरे, अशोक सोनवणे, संजय महाले, गणेश देसले, जीवन गोसावी, देविदास भामरे, युवराज वाघ, किरण अहिरे, अमोल पवार, राजू सोनवणे, आण्णा अहिरे, मंगलसिंग जोहरी, रवींद्र जाधव, राजेंद्र जाधव, राजेंद्र कापडे, जनार्दन अहिरराव, डी. डी. ह्याळीज, समाधान अहिरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.
 

Web Title: Marathi news satana news shivsena vidhansabha samparkpramukh prashant satpute