Vidhan sabha 2019 : मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न : डॉ. सतीश पाटील 

Vidhan sabha 2019 : मतदारसंघातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न : डॉ. सतीश पाटील 

एरंडोल ः पाच वर्षांत मतदारसंघाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केला असून, शासनाच्या विविध योजना तसेच आमदार निधीच्या माध्यमातून सर्व गावांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस- कॉंग्रेस-मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार आमदार डॉ. सतीश पाटील यांनी केले. 
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ आमदार डॉ. सतीश पाटील यांच्यासह आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी तालुक्यातील तळई, निपाणे, गालापूर, ताडे, भातखेडे, अंतुर्ली, उत्राण अहिर व गुजर हद्द, हनमंतखेडे, फरकांडे, उमरे यासह अनेक गावांत पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला. यावेळी ग्रामस्थांनी आमदार डॉ. पाटील व पदाधिकाऱ्यांची मिरवणूक काढून व वाजंत्री वाजवून स्वागत केले. मतदारांनी केलेल्या स्वागतामुळे आमदार डॉ. सतीश पाटील भावनाविवश झाले होते. 
यावेळी डॉ. सतीश पाटील यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना दिली. खानदेशात विरोधी पक्षाचा एकमेव आमदार निवडून आल्यामुळे सत्ताधारी पक्षाचे लोकप्रतिनिधी मला निवडणुकीत संपविण्याची भाषा करीत आहेत. मात्र, मतदारांचा पाठींबा व आशिर्वाद माझ्या पाठीमागे असल्यामुळे मला संपविण्याची भाषा करणारेच या निवडणुकीत संपतील असा टोला लगावला. मतदार व माझ्या प्रचारात सहभागी झालेले प्रामाणिक पदाधिकारी हीच माझी खरी ताकद असल्यामुळे माझा विजय निश्‍चित असल्याचा दावा त्यांनी केला. पाच वर्षाच्या कारकिर्दीत मतदारसंघातील प्रत्येक गावात विकासकामे करण्याचा प्रयत्न केला असून सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. मनोज पाटील, विधानसभा क्षेत्रप्रमुख पराग पवार, शहराध्यक्ष बबलू चौधरी, जिल्हा सरचिटणीस अमित पाटील, डॉ. राजेंद्र देसले, राजेंद्र शिंदे, आर. डी. पाटील, मनोराज पाटील, नगरसेवक डॉ. सुरेश पाटील, अभिजित पाटील, अहमद सय्यद, जिल्हा परिषद सदस्य हिंमत पाटील, विश्वास पाटील, सुभाष पाटील, रवींद्र पाटील, रामदास पाटील, निंबा पाटील, धनराज पाटील, शेतकी संघाचे माजी अध्यक्ष सुदाम पाटील, हासन देशमुख, अनिल चौधरी, डॉ. मगन पाटील, पंकज पाटील, फारुख देशमुख जुबेर पठाण, शंकर चौधरी, जयवंत महाजन, महानोर खेडकर, खलील देशमुख, संजय पाटील, डॉ. अजबराव पाटील, गुणवंतराव पाटील, भालचंद्र पाटील, रवींद्र पाटील, जगन पाटील, अनिल पाटील, पिंटू पाटील, नीलेश पाटील, धर्मराज पाटील, रावसाहेब पाटील, सखाराम पाटील, कौतिक पाटील, विनोद पाटील, दीपक बिऱ्हाडे, दशरथ पाटील, संदीप वाघ, उमेश देसले, पंडीत पाटील, प्रा. हरीश पाटील, बाळू पाटील, कैलास पाटील, कुस्तीगीर संघाचे तालुकाध्यक्ष संजय महाजन, योगराज महाजन, किशोर पाटील, रतन पाटील, राकेश माने यांच्यासह पदाधिकारी, परीसरातील सरपंच व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com