सातपुड्याच्या जंगलात दुर्मीळ पांढरा मोर,ग्रामस्थांकडून शंभर मोरांचा सांभाळ 

live
live

नाशिक ः सातपुड्याच्या पाच व सहा पूडामधील हरणखुरी (ता. धडगाव) गावातील भाडोला डोंगर परिसरात निसर्गाचा अनोखा चमत्कार पाह्यला मिळतोय. शिवारात दीडहजारांहून अधिक मोर असून त्यामध्ये पांढऱ्या मोरांची संख्या शंभरच्या आसपास असल्याचे इथल्या ग्रामस्थांचे म्हणणे आहे. 

शहादा (जि. नंदूरबार) येथील कृषी महाविद्यालयातील ग्रामीण कृषी कार्यानुभवतंर्गत अभ्यास करतांना सागर निकुंभे या विद्यार्थाला पांढऱ्या रंगाचे मोर दिसले. त्यांने ही बाब पक्षीमित्रांना सांगितली अन्‌ छायाचित्रातून ही दुर्मीळ जात पुढे आली. गावात आदिवासी बांधवांकडून गेल्या पाच वर्षात वन विभागाच्या 65 हेक्‍टर जमिनीवर वन संवर्धनाचे काम सुरु आहे. श्रमदानातून डोंगराच्या भागात झाडे लावली. त्यानंतर तितर आणि सश्‍यांबरोबर मोरांची संख्या वाढत गेली. जंगली श्‍वान, बिबट्या आणि तरस यांचा वावर वाढला. खाद्य उपलब्ध झाल्याने मोरांच्या संख्येत भर पडली, असे अर्जुन पवार यांनी सांगितले. 

   पांढऱ्या मोरांविषयी अधिक माहिती घेतल्यावर देशात अल्बिनो म्हणजे पांढरा मोर आढळले. तो पूर्ण पांढरा असतो. त्याचे डोळे लाल असतात. पण गावात जो पांढरा मोर आढळला, त्याचे पूर्ण शरीर पांढरे, मान निळी व डोळे देखील निळे आहेत. पांढऱ्या लांडोरचा गळा विटकरी आहे. असे मोर कुठेही आढळून आले नसल्याचे काही पक्षीमित्रांचे म्हणणे आहे. पक्षीमित्र उमेश नगरे यांनी "ब्रीडिंग' मधून या मोरांची उत्पत्ती झाली असल्याची शक्‍यता वर्तवली. पाकिस्तानमध्ये पाईड मोरांचे "ब्रीडिंग' केले जात असल्याची माहिती पुढे आली. इथले शेतकरी सुभाष पवारा म्हणाले, की परिसरात तितर, लाहोरीबरोबर मोर वाढले. सर्व टेकड्यांचे मुख्य टेकडी म्हणून सातपुडामधील या परिसरातील मोरांच्या संवर्धनासाठी वन विभागाने पावले उचलणे आवश्‍यक आहे. परिसराला मोर संरक्षण राखीव करून मोराच्या संवर्धनाबरोबर त्याचा अभ्यास करत पर्यटकांच्या माध्यमातून रोजगार मिळू शकणार आहे. 
 
""ग्रामीण कृषी कार्यानुभवतंर्गत अभ्यास करताना पांढऱ्या मोरांचे दर्शन घडले. वन्यजीव संरक्षण संस्थेत काम करत असल्याने पक्षीमित्रांना त्याबद्दलची माहिती कळवले. या मोरांची छायाचित्रे पाठवले. परिसरात खूप मोर असून त्यांना संरक्षण मिळणे आवश्‍यक आहे. जनजागृती करून मोराचे जंगलातील महत्व शेतकऱ्यांना पटवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. 
-सागर निकुंभे (विद्यार्थी, शहादा) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com