सातपूरच्या दोन कंपन्यांचे जलप्रदूषणाबद्दल उत्पादन बंद 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 मार्च 2018

सातपूर - सातपूर औद्योगिक क्षेत्रातील फाइन कार्बन पावडर व संकेत इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांनी विनाप्रक्रिया रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडून प्रदूषण केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन थांबविले आहे. 

सातपूर - सातपूर औद्योगिक क्षेत्रातील फाइन कार्बन पावडर व संकेत इंडस्ट्रीज या दोन कंपन्यांनी विनाप्रक्रिया रासायनिक सांडपाणी नाल्यात सोडून प्रदूषण केल्याबद्दल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन थांबविले आहे. 

अनेक कंपन्यांनी नियमानुसार कंपनीतील सांडपाणी प्रक्रियेसाठी एटीपी प्रकल्प उभा न करताच सांडपाणी सर्रास महापालिकेच्या हद्दीतील नाल्यात सोडल्यामुळे थेट नदीपात्रात जाऊन जलप्रदूषण होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. गेल्या हप्त्यापासून प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष मोहीम राबवत सातपूर औद्योगिक वसाहतीमधील सुमारे 32 कंपन्यांची तपासणी केली. त्यात फाइन कार्बन पावडर आणि संकेत इंडस्ट्रीजने नियम धाब्यावर बसवत कंपनीचे सांडपाणी प्रक्रिया न करताच नदीपात्रात सोडल्याचे आढळले. या दोन्ही कंपन्यांचे उत्पादन तत्काळ बंद करण्यात आले आहे. अन्य एका कंपनीला आपले उत्पादन बंद का करू नये, अशी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. 

एमपीसीबी कार्यालयाची रीतसर परवानगी घेऊन कारखान्याचे सांडपाणी, तसेच रसायनयुक्त पाण्यावर प्रक्रिया करणारी यंत्रणा उभी करणे गरजेचे आहे. ज्या कारखान्यांनी अशी यंत्रणा उभी केली नसेल तसेच पूर्वपरवानगी घेतली नसेल अशा कंपनी मालकांवर एमपीसीबीच्या कायद्याने फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे. 
-आर. यू. पाटील, प्रादेशिक अधिकारी, नाशिक विभाग 

Web Title: marathi news satpur water pollution Maharashtra Pollution Control Board