विजय हजारे ट्रॉफीसाठी महाराष्ट्र संघात सत्यजित बच्छावची निवड 

residentional photo
residentional photo

नाशिक बीसीसीआयतर्फे घेण्यात येणाऱ्या विजय हजारे करंडक एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ निवडण्यात आला. या संघात नाशिकचा डावखुरा फिरकीपटू सत्यजित बच्छाव याला स्थान मिळाले आहे. 

गेल्यावर्षी मुस्ताक अली टी- क्रिकेट स्पर्धेत भारतामध्ये सगळ्यात जास्त गडी बाद करण्याचा पराक्रम सत्यजितने केला होता. त्याचप्रमाणे विजय हजारे ट्रॉफी व रणजी करंडक स्पर्धेमध्येही उत्कृष्ट गोलंदाजी करत सत्यजितने आपली चमक दाखवली होती. यंदा बडोदा येथे 24 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश,उत्तर प्रदेश, बडोदा, पंजाब, दिल्ली, विदर्भ, ओरिसा व हरियाणा या संघासोबत लढत देणार आहे. तसेच महाराष्ट्राच्या संघाच्या प्रशिक्षकपदी रणजीपटू शेखर गवळी यांची पुनश्‍च निवड झाली आहे. सत्यजित बच्छाव व शेखर गवळी यांच्या निवडीचे नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे चेअरमन विनोद शहा, सेक्रेटरी समीर रकटे व पदाधिकारी यांनी अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com