स्कार्पिओ'वर वृक्ष कोसळून वधू- वरासह तीन जण जखमी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 एप्रिल 2018

चोपडा : चोपडा- यावल रस्त्यावर आज सकाळी पावणे दहाच्या सुमारास फागणे (ता. धुळे) येथील नवदांपत्य सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी परिवारासह यावल तालुक्‍यातील मनुदेवी येथे जात होते. रस्त्यावरच झाडाचा बुंधा जळत असलेले वृक्ष स्कार्पिओ चारचाकी वाहनावर पडल्याने पुढे बसलेले तीन जण गंभीर जखमी झाले. नववधू- वरही जखमी झाले असून, अन्य दोन वृद्ध महिलांना मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्या गंभीर जखमी झाल्या आहेत. 

स्कार्पिओ (एमएच 41व्ही2782) पूर्णतःचकनाचूर झाली. मागे बसलेले पाच जण व चालक हे मात्र एवढ्या मोठ्या दुर्घटनेत बालबाल बचावले आहेत. फागणे येथील रहिवासी प्रतीक कापडणे, जुईली कापडणे, सुमन दगडू शिंपी व शोभा बागुल (रा. बोरकुंड) हे जखमी झाले. मागच्या सीटवर बसलेले किरण शिंपी, दगडू शिंपी, प्रभाकर शिंपी, विजया शिंपी, धनश्री शिंपी हे सुखरूप आहेत. वृक्ष पडत आहे हे पाहून चालक गोपाल रामलाल पाटील (धुळे) याने ते पडू नये म्हणून जागेवरच गाडी फिरवल्याने झाडाची मोठी फांदी ही पुढच्या बाजूला पडल्याने मध्ये बसलेले तीन जणांना जास्त मार लागला आहे. जखमींवर चोपडा उपजिहा रुग्णालयात डॉ. मनोज पाटील, डॉ. पंकज पाटील यांनी तत्काळ उपचार केले असून जखमीची परिस्थिती चांगली असल्याचे डॉ. मनोज पाटील यांनी सांगितले. चोपडा- शिरपूर व चोपडा- यावल रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ मोठी डेरेदार वृक्षांना आग लावण्याचे प्रकार रात्रीअपरात्री असे प्रकार सर्रास सुरू आहेत. या प्रकाराकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

Web Title: marathi news scarpio accident