विद्यार्थी स्वागताची नगरसेवकांची संधी हुकली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 जून 2018

नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची स्थानिक नगरसेवकांची संधी यंदा शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता लागु असल्याने हुकली आहे. त्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या-त्या प्रभागातील मान्यवरांकडून विद्यार्थ्याचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

नाशिक : महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची स्थानिक नगरसेवकांची संधी यंदा शिक्षक मतदार संघाची आचारसंहिता लागु असल्याने हुकली आहे. त्याऐवजी महापालिका प्रशासनाने त्या-त्या प्रभागातील मान्यवरांकडून विद्यार्थ्याचे स्वागत करण्याचा निर्णय घेतला आहे. 

येत्या पंधरा जून पासून शाळा सुरु होणार आहे. महापालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी नगरसेवकांकडून विद्यार्थ्यांचे स्वागत होते. परंतू आचारसंहिता भंग होण्याच्या भितीमुळे नगरसेवकांना यंदा निमंत्रणे न देता स्थानिक मान्यवर नागरिकांना निमंत्रित करून नगरसेवकांना स्वागतापासून दोन हात लांब ठेवण्यात आले आहे. महापालिकेच्या शाळा सुरु होण्यापुर्वी दहा ते तेरा जून या कालावधी मध्ये शाळांमध्ये स्वच्छता मोहिम राबविली जाणार आहे.

वर्ग, शाळा परिसर, पाण्याच्या टाक्‍या ऐवढेचं नव्हे तर शाळांचे शौचालये देखील शिक्षकांकडून स्वच्छ करून घेतले जाणार आहे. शाळांमध्ये वातावरण निर्मिती करण्याचा हा भाग असून स्वच्छता मोहिमेतून स्वच्छतेचा संदेश देण्याबरोबरचं विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी महापालिकेचा प्रयत्न असल्याचे प्रशासनाधिकारी नितीन उपासनी यांनी माहिती दिली.

चौदा जुन ला शाळांमध्ये पुस्तक व शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविले जाणार आहे. पंधरा जुनला शाळांच्या परिसरात दवंडी पिटविण्याबरोबरचं प्रभात फेरीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेत येण्याचे आवतण दिले जाणार आहे. मान्यवरांकडून विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प व भेटवस्तु देवून स्वागत केले जाणार आहे. त्याशिवाय शाळांच्या बचत गटांमार्फत विद्यार्थ्यांना गोड जेवण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

दखल पात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण 
शाळा बाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण झाल्यानंतर आता शिक्षण विभागामार्फत पंधरा ते तीस जून या कालावधी मध्ये दखलपात्र विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा प्रवेशासाठी दखल पात्र विद्यार्थ्यांना प्रवेश देण्याची सोय उपलब्ध करून दिली जाणार आहे. पालिकेचे शिक्षक व स्वंयसेवी संस्थामार्फत सर्वेक्षण केले जाणार आहे. 

पहिलीची विद्यार्थी पुस्तकांपासून वंचित 
राज्य पाठ्यपुस्तक महामंडळाच्या वतीने पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके दिली जातात. महापालिकेकडे सर्व शिक्षा अभियानांतर्गत सव्वा दोन लाख पुस्तके प्राप्त झाली असून शाळांपर्यंत पोहोचली आहे. परंतू पहिलीच्या विद्यार्थ्यांची पुस्तके अद्याप पोहोचली नसल्याने ते विद्यार्थी वंचित राहतात कि काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. 

Web Title: MARATHI NEWS SCHOOL CORPOTER