तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयास ग्रामस्थांनी ठोकले टाळे

रोशन भामरे
बुधवार, 19 जून 2019

तळवाडे दिगरः बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मुख्याध्यापकास शिक्षक गैरहजर असल्यामुळे गावातील संतप्त नागरिकांना शाळेचा गेटला कुलूप लावले आहे.

तळवाडे दिगरः बागलाण तालुक्यातील तळवाडे दिगर येथील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीच्या दिवसापासूनच मुख्याध्यापकास शिक्षक गैरहजर असल्यामुळे गावातील संतप्त नागरिकांना शाळेचा गेटला कुलूप लावले आहे.

    नवीन शैक्षणिक वर्षाला सोमवार पासून सुरुवात झाली असून पहिल्या दिवसापासूनच शाळेतील सर्व शिक्षक उपस्थित नसल्यामुळे तसेच शाळेत उशिरा येत असल्याची माहिती मिळाली तसेच शाळेत फक्त चारच शिक्षक हजर असल्याने गावातील ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ग्रामस्थांनी शाळेला कुलूप ठोकले व शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगितले. व जोपर्यंत शाळेचे संस्थापक अध्यक्ष शाळेत हजर होत नाही तोपर्यंत शाळाचे कामकाज सुरु होणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले

       गेल्या वर्षापासून शाळेत चार शिक्षकांच्या जागा रिक्त व चार शिक्षक गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणत शैक्षणिक नुकसान होत असून त्यात भर म्हणजे शाळेतील शिक्षक वेळेवर हजर नसणे आणि गैरहजर असल्यामुळे विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणत शैक्षणिक नुकसानाला सामोरे जावे लागत आहे.

    स्कूल कमिटी अध्यक्ष ज्ञानेश्वर आहिरे, सरपंच दीपक पवार,उपसरपंच देविदास आहिरे,सटाणा कृषीउत्पन्न बाजारसमिती संचालक,पंकज ठाकरे,देविदास ठाकरे,हेमंत पवार,मुरलीधर पवार,संजय आहिरे, गोपाळ भामरे, गणेश ठाकरे,कैतिक आहिरे,युवराज देवरे,अविनाश धोंडगे यांच्यासह पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ मागील वर्षापसून शाळेतील चार शिक्षकांच्या जागा रिक्त असून मुख्याध्यापकासह चार शिक्षक गैरहजर होते त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्याचे मोठ्या प्रमाणत शैक्षणिक नुकसान होत असून जोपर्यंत शाळेचे संस्थापक अध्यक्ष शाळेत येणार नाहीत तोपर्यंत शाळेचे कुलूप उघडले जाणार नाही” – देविदास आहिरे, उपसरपंच तळवाडे दिगर 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news school lock