पालिकेच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाची प्रतिक्षा 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 13 जून 2018

नाशिक : शाळा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक राहिला असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या जुन्याचं गणवेशावर शाळांमध्ये यावे लागणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत व महापालिकेने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या गणवेश वाटपाच्या प्रक्रियेला मुहूर्त न मिळाल्याने विद्यार्थ्यांवर हि वेळ येणार आहे. 

नाशिक : शाळा सुरु होण्यास एक दिवस शिल्लक राहिला असताना विद्यार्थ्यांना त्यांच्या जुन्याचं गणवेशावर शाळांमध्ये यावे लागणार आहे. सर्व शिक्षा अभियानांतर्गत व महापालिकेने खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या गणवेश वाटपाच्या प्रक्रियेला मुहूर्त न मिळाल्याने विद्यार्थ्यांवर हि वेळ येणार आहे. 

शहरात महापालिकेच्या शाळांमध्ये एकुण 32 हजार विद्यार्थी आहेत. त्यातील साडे तीन हजार विद्यार्थी खुल्या प्रवर्गातील तर उर्वरित विद्यार्थी विविध जाती प्रवर्गातील आहेत. विविध जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रति दोन गणवेश चारशे रुपये गणवेशासाठी अदा केले जातात. यापुर्वी शालेय व्यवस्थापन समिती मार्फत गणवेश वाटप होत होते.

 शिक्षण विभागाच्या नवीन सुचनेनुसार विद्यार्थ्यांनी गणवेश खरेदी केल्याची पावती दाखविल्यानंतर त्यांच्या खात्यावर गणवेश निधी जमा होणार आहे. त्याव्यतिरिक्त विद्यार्थ्यांमध्ये अन्यायाची भावना निर्माण होवू नये म्हणून महापालिके मार्फत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रति दोन गणवेश चारशे रुपये वाटप करण्याचे धोरण अवलंबिण्यात आले आहे. विविध जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानांतर्गत निधी प्राप्त होतो परंतू अद्याप पर्यंत महापालिकेकचे सर्व शिक्षा अभियानाचा गणवेश निधी प्राप्त झाला नाही.

महापालिके मार्फत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना गणवेश देण्याचे धोरण अवलंबिण्यात आले असले तरी अद्याप पर्यंत निधी मंजुरीच्या प्रतिक्षेत आहे त्यामुळे शाळा सुरु होईपर्यंत विद्यार्थ्यांच्या खात्यांवर गणवेशाचा निधी न पडल्याने यंदाही शाळेच्या पहिल्या दिवशी जुन्या गणवेशावर विद्यार्थ्यांना यावे लागणार आहे. 
पंधरा ऑगष्ट पर्यंत निधी 

   सर्व शिक्षा अभियानांतर्गत येत्या दहा ते पंधरा दिवसात निधी येणे अपेक्षित आहे. निधी आल्यानंतर विद्यार्थ्यांना गणवेश निधीचे वाटप करेपर्यंत ऑगष्ट महिना उजाडणार आहे. शिक्षण विभागातील सुत्रांनुसार पंधरा ऑगष्ट पर्यंत संपुर्ण विद्यार्थ्यांपर्यंत गणवेश पुरठा होईल असा दावा करण्यात आला आहे. परंतू तो पर्यंत अडिच महिने विद्यार्थ्यांना जुन्या गणवेश वापरावा लागणार आहे. 
 

Web Title: marathi news school uniform