द्वितीय वर्ष बीफार्मच्या थेट प्रवेशाला उद्यापासून सुरवात 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जुलै 2018

नाशिक : औषधनिर्माणशास्त्र शाखेतील पदवी अभ्यासक्रम बी. फार्मसीच्या थेट द्वितीय वर्ष प्रवेशासाठी वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला सोमवार (ता.9) पासून सुरवात होत आहे. 16 जुलैपर्यंत अर्जाची अंतिम मुदत असेल. डिप्लोमा झालेल्या विद्यार्थ्यांना प्रक्रियेत सहभागी होता येईल. 

   विद्यार्थ्याने औषधनिर्माणशास्त्र शाखेतून पदविका शिक्षण किमान 45 टक्‍के गुणांसह पूर्ण केलेले असावे. राखीव प्रवर्गासाठी व दिव्यांगांसाठी 40 टक्‍के गुणांसह उत्तीर्ण असणे आवश्‍यक आहे. कॅप राऊंडच्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. याअंतर्गत विद्यार्थ्यांना अर्ज भरतांना कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. 

असे आहे वेळापत्रक 

ऑनलाईन नोंदणी व कागदपत्र अपलोड ------9 ते 16 जुलै 
कागदपत्र पडताळणी व कन्फर्मेशन------------10 ते 16 जुलै 
प्रारूप गुणवत्ता यादी-------------17 जुलै 
हरकत नोंदविण्याची मुदत------------------18 व 19 जुलै 
अंतीम गुणवत्ता यादी------------20 जुलै 
कॅप राऊंड एकचा ऑप्शन फॉर्म--------21 ते 23 जुलै 
कॅप राऊंड एकची निवड यादी-----24 जुलै 
निवड झालेल्यांना प्रवेशाची मुदत-------25 ते 27 जुलै 
रिक्‍त जागांचा तपशील----------28 जुलै 
दुसऱ्या कॅप राऊंडसाठी ऑप्शन फॉर्म------29 ते 31 जुलै 
दुसऱ्या कॅप राऊंडची निवड यादी---1 ऑगस्ट 
प्रवेश निश्‍चितीसाठी मुदत----------2 ते 4 ऑगस्ट 

Web Title: Marathi news second year admission process