vidhansabha 2019 अखेर पश्चिममध्ये सीमा हिरेंची बाजी 

live
live

नशिकः विद्यमान आमदारांसाठी डोकेदुखी ठरलेल्या आणि अत्यंत अटीतटीच्या नाशिक पश्चिम मतदार संघात भाजपच्या सीमा हिरे यांनी इतर उमेदवारांवर मात करत ही प्रतिष्ठेची लढत ९ हजार ६२२ जिंकली.

 पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांच्या टक्केवारीत सरासरी साडेचार टक्‍क्‍यांनी घट झाली. ही घट विद्यमान आमदारांसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्‍यता आहे तर विरोधकांनी हक्काचे मतदान पाडून घेतल्याने त्यांना पारडे जड होते. भाजपच्या विद्यमान आमदार सीमा हिरे यांच्याविरोधात महाआघाडीचे डॉ. अपूर्व हिरे यांच्यात खरी लढाई दिसली. मनसेचे दिलीप दातीर, माकप मित्र पक्ष आघाडीचे डॉ.डी.एल.कराड व शिवसेना बंडखोर अपक्ष विलास शिंदे अशा बहुरंगी लढतीने मतांचे विभाजन अटळ होते. त्यामुळे विजयी उमेदवार मोठ्या मताधिक्‍याने निवडून येण्याची शक्‍यता धूसर झाली होती.या मतदारसंघात भाजपला मित्रपक्ष शिवसेनेने पहिला अपशकुन केला. महायुतीचा धर्म पाळला गेला असता तर टक्का कमी होऊनही युतीचाच उमेदवार निवडून आला असता, पण भाजपला उपद्रव मूल्य दाखविण्याच्या इराद्याने शिवसेनेने पुरस्कृत अपक्ष उमेदवाराला साथ दिल्याने मतांचे विभाजन झाले असलेतरी हिरे यांनीच बाजी मारत ही प्रतिष्ठेची लढत जिंकली.
.
एकूण २७ फेऱ्या 

निवडणूक निकाल - 

एकूण आकडेवारी

१) सीमा हिरे- ७७०९७

२) दिलीप दातीर-  २५३१२

३) अपूर्व हिरे- ६७४७५

४) डॉ कराड- २२४०७

५) विलास शिंदे- १६२६०

नाशिक पश्चिम विधानसभा मतदार संघातून सीमा हिरे ९६२२ मतांनी विजयी
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com