डिसेंबरपासून जेष्ठ,दिव्यांगांना टपाली मतदानाची सुविधा 

विनोद बेदरकर सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

नाशिक- केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना टपालाद्वारे मतदान करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोव्हेंबर-डिसेंबर-2019 मध्ये होणाऱ्या झारखंड विधानसभा निवडणुकीपासून दिव्यांग मतदार आणि 80 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या जेष्ठ नागरिकांना आता मिळणार टपाली मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा मिळणार आहे. भारत निवडणूक आयोगाने नुकताच हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नाशिक जिल्ह्याने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याविषयीसुचना मांडली होती. 

नाशिकचे तत्कालीन उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांच्या या अभिनव संकल्पनेला भारत निवडणूक आयोगाने हिरवा कंदील दर्शवला आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये उपजिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून कार्यरत असतांना लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीनंतर निवडणूक प्रक्रियेमध्ये नेमक्‍या कोणत्या सुधारणा करणे आवश्‍यक आहे,याबाबतचा सविस्तर प्रस्ताव राज्याचे प्रधान सचिव व मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यलया मार्फत भारत निवडणूक आयोगास जून 2019 मध्ये सादर केला होता,त्याची दखल घेऊन जेष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना टपाली मात्र पत्रिकेद्वारे मतदान करण्याची सुविधा देण्याची अंमलबजावणी भारत निवडणूक आयोगाने नोव्हेंबर-डिसेंबर 2010 मध्ये होणाऱ्या झारखंड राज्याच्या विधानसभा निवडणुकीपासून करण्याचा निर्णय घेतला आहे. 

उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर हे केंद्रीय निवडणूक आयोगाचे राष्ट्रीय स्तर प्रशिक्षक असून केंद्रीय निवडणूक आयोगाने त्यांच्या निवडणूक प्रक्रियेत सुधारणा करण्या साठीच्या अनेक कल्पना अंमलात आणल्या आहेत.लोकसभा व विधानसभा निवडणुकीत मतदान करणाऱ्या दिव्यांग आणि जेष्ठ नागरीक यांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. लोकसभा निवडणूकीनंतर नाशिक जिल्ह्यातर्फे त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे ही सूचना मांडली होती. 

"दिव्यांग आणि जेष्ठ नागरिकांना टपाला द्वारे मतदान करण्याची सुविधा हे निवडणूक सुधारणेच्या दिशेने टाकलेले एक अतिशय महत्त्वपूर्ण पाऊल असून,याबाबत लोकसभा निवडणुकीनंतर नाशिक जिल्ह्याने भारत निवडणूक आयोगास प्रस्ताव सादर केला होता, त्यास निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे,याचा निश्‍चितच आनंद आहे.या पूर्वीही निवडणूक कामकाजात सुधारणा करण्यासंबंधी आम्ही दिलेल्या अनेक प्रस्तावांचा भारत निवडणूक आयोगाने सकारात्मक विचार केला आहे." 
अरुण आनंदकर, (उपजिल्हाधिकारी महसूल प्रबोधिनी नाशिक)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news SENIOR VOTING