बंद सेतूच्या पर्यायी व्यवस्थेचे कामकाज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

नाशिकः जिल्हा प्रशासनाने शहरातील दाखले वितरणासाठीचे सेतू कार्यालयांचे कामकाज बंद केले आहे. त्याऐवजी 83 "आपले सरकार' या केंद्राद्वारे दाखले वितरण सुरू केले आहे. त्यात नागरिकांना केंद्राच्या माहितीसाठी प्रतिनिधी (नेव्हिगेटर)द्वारे केंद्राची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

नाशिकः जिल्हा प्रशासनाने शहरातील दाखले वितरणासाठीचे सेतू कार्यालयांचे कामकाज बंद केले आहे. त्याऐवजी 83 "आपले सरकार' या केंद्राद्वारे दाखले वितरण सुरू केले आहे. त्यात नागरिकांना केंद्राच्या माहितीसाठी प्रतिनिधी (नेव्हिगेटर)द्वारे केंद्राची माहिती उपलब्ध करून दिली जाणार आहे. 
सेतूद्वारे दाखले वितरण बंद केल्यानंतर बुधवारी (ता. 7) जिल्हा प्रशासनाने शहरातील 83 ऑनलाइन दाखले वितरण केंद्रचालकांची बैठक घेतली. सकाळी सर्वांचे प्रशिक्षण घेतले. सर्व केंद्रांची नेव्हिगेटरद्वारे ऑनलाइन माहिती उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शहरातील कुठलाही नागरिक, विद्यार्थ्यांना स्मार्टफोनवर "आपले सरकार' केंद्राचे ऍप्लिकेशन डाउनलोड करता येईल. त्याद्वारे दाखल्यासाठी अर्ज करता येणार आहे. शहरातील प्रभागनिहाय केंद्राची माहिती स्मार्टफोनवर उपलब्ध होईल. 

लोकप्रतिनिधींना पत्र 
दाखले वितरणाच्या नव्या व्यवस्थेची माहिती देण्यासाठी शहरातील सर्व नगरसेवक व आजी- माजी आमदारांना पत्र देऊन त्यांच्या भागातील "आपले सरकार' ऑनलाइन केंद्र व त्यांच्या पत्त्यांची माहिती कळविली जाईल. सेतू कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे बंद झाल्याच्या पहिल्याच दिवशी कुठलाही परिणाम झालेला नसल्याचे स्पष्ट झाले. 
सध्या उपलब्ध असलेल्या "आपले सरकार' केंद्राद्वारे पहिल्या दिवशी साधारण 30 दाखल्यांचे ऑनलाइन अर्ज प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे नवीन ऑनलाइन केंद्राद्वारे दाखले वितरणाची सुविधा स्वीकारली गेल्याचे पहिल्याच दिवसाचे चित्र आहे. 

शहरातील केंद्राची नेव्हिगेटरद्वारे माहिती देण्यासाठी पिनींगचे कामकाज दोन दिवसांत पूर्ण होईल. संबंधित केंद्रचालकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे घरबसल्या नागरिकांना केंद्राची माहिती उपलब्ध करून ऑनलाइन दाखले मिळविणे सोयीचे हाईल. त्याला पहिल्या दिवसांपासून प्रतिसाद मिळत आहे. 
-शशिकांत मंगरुळे, उपजिल्हाधिकारी 

Web Title: marathi news setu band progm