कार्यालय बंदमुळे सेतूचा न्यायालयात जाण्याचा इशारा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

नाशिकः दिड वर्षे मुदत बाकी असतांना नाशिक जिल्ह्यात सेतू कार्यालय बंद करण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाच्या विरोधात कंपनीने न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. 
जिल्ह्यात गुजरात इन्फोटेक कंपनीतर्फे सेतू कार्यालये चालविली जातात. प्रशासनाने सेतूला दिलेल्या ठेक्‍यानुसार आणखी दिड वर्षे सेतू कार्यालय चालणे अपेक्षित आहे. मात्र दीड वर्षाचा कालावधी बाकी असताना प्रशासनाने सेतू केंद्रच बंद केल्याने गुजरात इन्फोटेक कंपनीने प्रशासना विरोधात आंदोलनाचा इशारा दिला आहे. पुढील आठवड्यात कंपनी जिल्हा प्रशासनाच्या विरोधात न्यायालयात जाणार आहे. 

डिजीटल इंडियाला प्रोत्साहन देतानाच आपले सरकार पोर्टलद्वारे नागरिकांना घरबसल्या दाखले देण्याच्या निर्णयामुळे प्रशासनाने सेतूचे शहरातील पाच उपकेंद्र बंद केली आहे. दीड वर्षाचा कालावधी बाकी आहे. 
शहरातील मुख्य सेतूसह पाच उपक्रेंद्रासाठी 1 एप्रिल 2016 रोजी गुजरात इन्फोटेकला कंत्राट दिले असून 31 मार्च 2019 पर्यंत या कराराची मुदत आहे. असे असतांना पुर्वसुचना न देता प्रशासनाने सेतू कार्यालय बंद केली असून सॉफ्टवेअरमध्ये एकही एन्ट्री न करण्याचे निर्देश सेतू चालकाला दिले आहे. 
अशी सेतू कार्यालयाच्या सूत्रांनी तक्रार केली. 
 
Web Title: marathi news setu office closed