प्रकाशा शिवारात मृतावस्थेत आढळला बिबट्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जुलै 2019

शहादा ः तालुक्‍यातील प्रकाशा परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. नागरीकांच्या निदर्शनास आला होता. मात्र आज सकाळी प्रकाशा शिवारात भरत दशरथ पाटील यांच्या शेतात बिबट्या मूतावस्थेत आढळून आला. 

शहादा ः तालुक्‍यातील प्रकाशा परिसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता. नागरीकांच्या निदर्शनास आला होता. मात्र आज सकाळी प्रकाशा शिवारात भरत दशरथ पाटील यांच्या शेतात बिबट्या मूतावस्थेत आढळून आला. 
प्रकाशा शिवारात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या असल्याचे परिसरातील नागरीकांच्या निदर्शनास आले होते. मात्र आज बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. मूतावस्थेतील बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांनी एकच गर्दी केली होती .शेतकऱ्यांनी सकाळी वनविभागाला या संदर्भात माहिती दिली होती; मात्र दुपारपर्यत वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोचले नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. वनविभाग या मृत बिबट्याला ताब्यात घेऊन त्याचे शवविच्छेदन करणार आहे. त्यानंतर बिबट्याच्या मृत्यूचे कारण समजेल अशी माहिती वनविभागाने दिली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada bibtya daith