फवारणी करताना विषबाधा होवून तरूणाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 15 सप्टेंबर 2019

शहादा ः कोठली (ता. शहादा) येथील युवकाचा शेतात फवारणी करताना विषबाधा होवून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. प्रविण धनराज माळी (वय 19) असे युवकाचे नाव असून, शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

शहादा ः कोठली (ता. शहादा) येथील युवकाचा शेतात फवारणी करताना विषबाधा होवून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. प्रविण धनराज माळी (वय 19) असे युवकाचे नाव असून, शवविच्छेदन केल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
कोठली (ता. शहादा) येथील रहिवासी असलेला प्रविण माळी खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिक्षण घेत होता. शनिवारी (ता.14) सुटी असल्याने तो वडीलांसोबत फवारणीच्या कामासाठी गेला होता. वडिलांसोबत फवारणी करत असताना त्याला थोडासा त्रास जाणवत होता पण पाऊस सुरू असल्यामुळे तुम्ही घरी चला मी तुमच्या पाठोपाठ येतो; असे सांगितल्यावर वडील घरी निघून आले. मात्र बराच वेळ झाल्यावर देखील प्रवीण शेतातून आला नसल्यामुळे ते परत शेतात पाहण्यासाठी गेले. प्रवीणला हाका मारल्या असताना देखील प्रतिसाद न मिळाल्यामुळे ते शेतात फिरू लागले. परंतू प्रवीण जमिनीवर पडलेला आढळून आला. त्याला उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याची हालचाल बंद असल्याचे वडिलांच्या लक्षात आल्यावर वडील गावात परत येवून ग्रामस्थांना घेऊन शेतात गेले. ग्रामस्थांनी तपासले असता तो मृत झाल्याचे निदर्शनास आले. त्याच्या पश्‍चात आई- वडील व एक भाऊ असा परिवार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada boy death favarni