शहादा तालुक्यात फक्त १८ हजार नागरिकांनी घेतली लस

लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना जागृत करावे.
corona vaccin
corona vaccincorona vaccin

शहादा : तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. जवळपास तीन हजार रुग्ण बाधित आहेत. त्या अनुषंगाने लसीकरण अत्यंत कमी झाले आहे. तालुक्याची लोकसंख्या पाहता आतापर्यंत एक लाख २५ हजार नागरिकांचे लसीकरण व्हायला पाहिजे होते, ते झालेले नाही. आतापर्यंत फक्त १८ हजार नागरिकांचे लसीकरण झाले आहे. त्यामुळे लसीकरणासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेऊन ग्रामीण भागातील नागरिकांना जागृत करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी केले.

corona vaccin
सातपुड्याच्या दुर्गम भागात कोरोना; नंदूरबार प्रशासन अलर्टवर

शहादा तालुक्यात वाढत्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाहता शंभर बेडचे कोविड केअर सेंटर उभारण्यात येत आहे. त्याचबरोबर ऑक्सिजन प्लाॅंटही उभारला जात असून, त्याची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे यांनी केली. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती अभिजित पाटील, प्रांताधिकारी डॉ. चेतनसिंग गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, गटविकासाधिकारी राघवेंद्र घोरपडे, तालुका आरोग्याधिकारी डॉ. राजेंद्र वळवी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

corona vaccin
धुळे जिल्ह्यातील उन्हाळ कांदा थेट नागपूरच्या बाजारात

डॉ. भारूड म्हणाले, की नंदुरबार जिल्ह्यात आधीपासूनच आरोग्य व्यवस्था मजबूत नसल्याने कोविड काळात रुग्णांना उपचारासाठी आरोग्य विभागाला मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यातील शहादा आणि नंदुरबार हे दोन तालुके कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. सध्या जिल्ह्यात नऊ हजारांपेक्षा अधिक ॲक्टिव्ह कोरोना रुग्ण असून, एकट्या शहादा तालुक्यातील जवळपास तीन हजार रुग्ण बाधित आहेत. एवढ्या साऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी पुरेशी व्यवस्था करणे गरजेचे झाले आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com