शहादा येथे ८० खाटांच्या कोविड आयसोलेशन सेंटरला मिळाली मंजुरी ! 

शहादा येथे ८० खाटांच्या कोविड आयसोलेशन सेंटरला मिळाली मंजुरी ! 

शहादा : येथील ८० खाटांच्या कोविड आयसोलेशन सेंटरला मंजुरी मिळाली असून ते लवकरच कार्यान्वित  करणेसाठी प्रयत्न सुरू आहेत. यामुळे कोरोनाचा अहवाल आल्यानंतरही काही रूग्णांमध्ये लक्षणे आढळून येत नसलेल्या रूग्णांवर उपचारासाठीचा मार्ग मोकळा होणार आहे. अशी माहिती प्रांताधिकारी डॉक्टर चेतन गिरासे यांनी दिली.

शहरासह ग्रामीण भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरी त्यांच्यात कोरोनाची कुठलीही लक्षणे आढळून येत नाहीत, अशा रुग्णांवर जिल्हा रुग्णालयात उपचार केले जात आहे. मात्र जिल्ह्यात कोरोना बाधीतांची संख्या वाढत असल्याने जिल्हा रुग्णालयाच्या कोविड सेंटरवर दिवसेंदिवस ताण वाढत चालला आहे. आधीच अनेक कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूचे संक्रमण झाले असल्याने अधिकारी व कर्मचाऱ्यांची संख्या कमी झाली आहे. अशा परिस्थितीत जिल्हा रुग्णालयाचा भार कमी करण्यासाठी शहादा येथे कोविड आयसोलेशन सेंटर कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला. त्याला जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली असून ऐंशी बेडचे कोविड आयसोलेशन सेंटर मंजूर केले आहे. मोहिदा शिवारातील समाज कल्याण विभागाच्या चार वसतिगृहात पैकी एका इमारतीत क्वारंटाईन सेंटर असणार आहे, तर अन्य दोन इमारतीत पॉझिटिव्ह अहवाल आलेले मात्र लक्षणे आढळून येत नाहीत अशा रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. या सेंटरची क्षमता ऐंशी बेडची राहणार आहे. तर चौथ्या इमारतीत कोरोना बाधित व लक्षणे असणाऱ्या रुग्णांवर उपचार केले जाणार आहे.

शासनाने या सेंटरसाठी चार डॉक्टर व आठ नर्सेस तसेच एक्सरे इसीजी साठी तंत्रज्ञ अशा दोन टीमला मंजुरी दिली आहे. प्रत्येकी दहा दिवसांसाठी एक टीम कार्यान्वित असेल. तर अकराव्या दिवसापासून दुसरी टीम कार्यरत राहील. दहा दिवसांचा कार्यकाळ पूर्ण करणाऱ्या अधिकारी  कर्मचाऱ्यांच्या टीमला दहा दिवसांची सुट्टी असे नियोजन करण्यात आले आहे. त्याच प्रमाणे केंद्र व राज्य शासनाच्या आदेशान्वये रुग्णाला देण्यात येणारा उपचार व औषध पुरवठा केला जाणार आहे.

सेंटर कार्यान्वित करण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या प्रशासकीय व तांत्रिक बाबींची  पूर्तता प्रशासनातर्फे केली जात असून लवकरात लवकर हे कोविड आयसोलेशन सेंटर कार्यान्वित होईल असा विश्वास असे डॉक्टर गिरासे यांनी व्यक्त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com