वादळी पावसामुळे पिके जमीनदोस्त ...शेतांना जलाशयाचे स्वरूप ! 

वादळी पावसामुळे पिके जमीनदोस्त ...शेतांना जलाशयाचे स्वरूप ! 

कहाटूळ  : कहाटूळ (ता. शहादा) परिसरात काल (ता.२) रात्री वादळ वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे पपई, मिरचीसह दुबार पेरणी केलेल्या खरीप पिकेही पावसामुळे वाहून गेले. त्यामुळे पुन्हा पावसाने नुकसान करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. पिकांसाठी पाऊस यावा, म्हणून आर्वणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पावसाने हजेरी लावली मात्र नुकसान केले. त्यामुळे शेतकऱ्यांची अवस्था गंभीर झाली आहे. जूनमध्ये झालेल्या वादळामुळे शहादा तालुक्यात एक कोटीवर पिकांचे नुकसान झाले आहे. ती भरपाई मिळत नाही तोच पुन्हा दुसऱ्या पावसाने पुन्हा लाखोचे नुकसान केले. 

कहाटूळ परिसरात दोन दिवसापासून उन्हाचे प्रमाण वाढले होते. उकाडा देखील जाणवत होता. अचानक गुरुवारी रात्री वातावरणात बदल झाला. वादळी वाऱ्यासह धो- धो पावसाला सुरुवात झाली. वादळी पावसाने जवळपास दीड तास चांगलेच झोडपून काढले.वादळामुळे कहाटूळसह ,लोंढरे, धांद्रे, जयनगर ,निंभोरा कवठळ त.श. सोनवद परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री झालेल्या पावसाची स्थिती पाहण्यासाठी शेतकरी आज सकाळी आपल्या शेतामध्ये गेले. तेव्हा त्यांना पाऊस झाल्याचा आनंदाचे दुःखांत रूपांतर व्हायला क्षणही लागला नाही. शेतात खरिपाचे दुसऱ्यांदा पेरलेले ज्वारी, मका, सोयाबीन आदी पिके मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाहाने वाहून गेले.जे पिके उगवले होते. ते शेतात साचलेल्या पाण्याचा तळ्यामुळे पाण्यात बुडाली, कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन योजना कार्यान्वित केली होती. ठिबकचे साहित्यही वादळामुळे व पावसामुळे वाहून गेले. अनेक मोठमोठी झाडे उन्मळून पडले आहेत.तसेच पपईचे पीक चार ते पाच फुटाचे उंचीचे झाले आहे. त्याच्या फांद्या व झाडे वादळामुळे उन्मळून पडले. मिरची शेतात निर्माण झालेल्या जलाशयातच बुडाली. हे सर्व पाहताच शेतकऱ्यांचा हातपाय थरथरायला लागले. जोरदार पाऊस झाल्याचा आनंदाने भारावलेला शेतकऱ्याला रात्री आपल्या शेतात वादळाने नुकसान केल्याची भुसटही कल्पना नव्हती.मात्र सकाळी शेतात गेल्यावर शेतकऱ्यांना नुकसान दिसले. 


"मी यावर्षी चार एकर क्षेत्रात ४००० पपईच्या झाडांची लागवड केलेली आहे. उन्हाळ्यात उन्हाचे प्रमाण जास्त होते. पाणीटंचाईचा सामना करत मोठ्या मेहनतीने पपई लावणी केली होती .प्रति झाड १२० रुपये खर्च आतापर्यंत झालेला आहे.माझ्या शेतात जवळपास पाचशे ते सहाशे झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्याचबरोबर परिसरातील शेतकऱ्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

अजय एकनाथ पाटील.पपई उत्पादक शेतकरी,कहाटूळ 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com