शहाद्यात दोन दुकानांना आग; लोखो रुपयांचे नुकसान 

agg
agg

शहादा : शहरातील दोंडाईचा रस्त्यावरील खरेदी विक्री संघा समोरील राज पाईप या दुकानाला रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन दुकानांचे लाखोंचे नुकसान झाले. क्षणार्धात आगीने रौद्ररूप धारण करत दूरपर्यंत आगीचे लोट पसरत होते. सकाळपर्यंत आग धुमसत होती. घटनास्थळी शहादा, शिरपूर, तळोदा, खेतिया, पुरुषोत्तमनगर येथील अग्निशामक बंबांनी पाच तासांचे शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्‍यात आणली. 

शहरातील खरेदी-विक्री संघासमोरील मोती बॅंक व जळगाव बॅंकेचा मध्ये असलेल्या राज पाईप या हार्डवेअरचा दुकानाला आज रात्री दोन वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. आगीने क्षणार्धात रौद्ररूप धारण केले. शेजारीच असलेल्या बुरहानी हार्डवेअर या दुकानाला ही आग लागल्याने दोन्ही दुकाने जळून खाक झाले. त्यात लाखों रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. घटनास्थळी शहादा, खेतिया, तळोदा ,नंदुरबार ,शिरपूर, पुरुषोत्तमनगर आदी ठिकाणाहून अग्निशामक बंब दाखल झाले होते. सकाळ पर्यंत शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्‍यात आणली. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी पुंडलीक सपकाळे ठाण मांडून बसले होते. सुदैवाने जवळच असलेल्या बॅंकेचे कोणतेही प्रकारचे 
नुकसान झाले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com