भाऊ, बठं गे, आते तुम्हीच सांगा आमणा आसू कोण पूसी 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

मंदाणे (शहादा) : भाऊ, गया दहावरील पाईन कोल्ला दुष्काळले समोर जाई राहीनूत, त्यानंतर यंदाना वल्ला दुष्कायनी ते मातर मरानीच येळ देखाई दिली. भाऊ, बठं गे हातमाईन, आते तुम्हीच सांगा आमणा आसू कोण पुसी, जगान का मरान? असी येळ ईजायल से, पोरे मोठा व्हई ऱ्हायनात, पोरीसनं लगीन करान से, आते कसं व्हई, अशा व्यथा डोळ्यात अश्रू आणत शहादा तालुक्यातील मंदाणेसह परिसरातील शेतकऱ्यांनी मांडली अन्‌ पालकमंत्री जयकुमार रावल, आमदार राजेश पाडवी यांच्यासह उपस्थितांचेही डोळे पाणावले. 

सततच्या व परतीच्या जोरदार पावसामुळे व पूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बऱ्याच गावात खरीप पिकांचे पूर्णत: नुकसान झाले. शहादा तालुक्यातील जवळपास सर्वच गावांमध्ये ओल्या दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यात पूर्व भागातील मंदाणेसह परिसरातील गावांमध्ये परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे कडधान्यांसह मका, बाजरी, ज्वारी, कपाशी, सोयाबीन, फळबाग आदींचे पूर्णत: नुकसान झाले आहे. हातात काहीच येणार नसल्याने पेरणीसह खते, किटकनाशकांचा खर्च पाण्यात गेला आहे. रब्बीसाठी देखील शेतकरी मुकणार आहे. मात्र या नुकसानीच्या पंचनाम्यांना जाचक अटी व विविध विभागांच्या संगनमतांचा अभाव यामुळे पंचनाम्यांना उशीर होत आहे. पीक विमा कंपनीकडूनही शेतकऱ्यांच्या नुकसानीची दखल घेतली जात नसल्याने बळीराजा पुरता कोलमडला आहे. 

या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड यांनी तत्काळ कृषी, महसुल व ग्रामविकास विभागाला पंचनामे करण्याचे आदेश दिले. आज पालकमंत्री जयकुमार रावल यांनी आमदार राजेश पाडवी यांच्यासह मंदाणे, म्हसावद सारंगखेडासह परिसरातील गावांमधील पिकांच्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिली. त्यावेळी शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. शेतकऱ्यांना धीर देत पालकमंत्री श्री. रावल म्हणाले, सरकार हे शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. ज्यांचे ज्यांचे नुकसान झाले आहे. त्यांना शंभर टक्के मोबदला मिळणार आहे. जो पर्यंत मोबदला मिळणार नाही तो पर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. येणाऱ्या सात - आठ दिवसात पंचनामे पूर्ण होतील. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada jaykumar rawal farmer