यशवंतरावानी "एचएएल', शरद पवारांनी "मुक्त विद्यापीठ, भाजपचे काय?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 मार्च 2018

नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या समारोपात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून "शरद पवारांना कृषीचे काय कळते', असा सवाल करणाऱ्या शहरातील भाजपच्या आमदारांवर सोमवारी (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा तोफ डागली. कृषीसंदर्भात वारंवार बारामतीला सल्ला घेण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा सवाल करण्याचा सल्ला देताना, यशवंतराव चव्हाण यांनी नाशिकला "एचएएल'ची, तर शरद पवार यांनी "मुक्त विद्यापीठ' दिले.

नाशिकः राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या हल्लाबोल मोर्चाच्या समारोपात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांवर सडकून टीका केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून "शरद पवारांना कृषीचे काय कळते', असा सवाल करणाऱ्या शहरातील भाजपच्या आमदारांवर सोमवारी (ता. 12) राष्ट्रवादी कॉंग्रेसने पुन्हा तोफ डागली. कृषीसंदर्भात वारंवार बारामतीला सल्ला घेण्यासाठी जाणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना असा सवाल करण्याचा सल्ला देताना, यशवंतराव चव्हाण यांनी नाशिकला "एचएएल'ची, तर शरद पवार यांनी "मुक्त विद्यापीठ' दिले. भाजपच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक नाशिकला काय दिले, असा सवाल शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत करून भाजपवर हल्लाबोल केला. 
उत्तर महाराष्ट्राच्या हल्लाबोल मोर्चाचा समारोपाच्या भाषणात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांच्या दत्तकविधानाचा समाचार घेतला. वर्षभरात नाशिकचा काय विकास केला, असा सवाल करत "भाडोत्री बाप नको', अशी टीका केली होती. श्री. पवार यांच्या वक्तव्यावर भाजपचे आमदार बाळासाहेब सानप व प्रा. देवयानी फरांदे यांनी प्रत्युत्तर देताना श्री. पवार यांच्या कृषिप्रेमावर टीका केली. त्यानंतर सोमवारी पुन्हा पालिका मुख्यालयात त्याचे पडसाद उमटले. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष रंजन ठाकरे, गटनेते गजानन शेलार यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर शाब्दिक हल्ला चढविला.
वर्षभरात नाशिककरांना काहीच न मिळाल्याच्या भावना श्री. पवार यांनी भाषणातून व्यक्त केल्या. नाशिकला दत्तक घेण्याची भाषा करणाऱ्यांनी वर्षभरात काहीतरी करून दाखवायला हवे होते, पण प्रत्यक्षात नाशिककरांच्या पदरी निराशाच पडली, असे सांगितले. माजी संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांना नाशिककरांनी बिनविरोध निवडून दिल्यानंतर त्यांनी ओझर येथे "एचएएल'चा कारखाना दिला. मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी "यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ' दिल्याची आठवण श्री. ठाकरे यांनी करून दिली. 
 

Web Title: marathi news sharad pawar