जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना ११७ कोटी मंजूर 

जामनेर, पाचोरा तालुक्यातील प्रकल्पग्रस्तांना ११७ कोटी मंजूर 

शेंदुर्णी ः जामनेर व पाचोरा तालुक्यातील विविध प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने सुमारे ११७ कोटी रुपये मंजूर केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरुड यांच्या प्रयत्नानंतर सुटल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे. 

जामनेर व पाचोरा तालुक्यातील सुनसगाव-भराडी लघु पाटबंधारे प्रकल्प, पाळधी साठवण तलाव, शेंदुर्णी शामसिंह बुआ प्रकल्प, चिंचखेडा पुनर्वसन, सुरप्रकल्प कापूसवाडी, लोंढ्री, पिंपळगाव कमानी प्रकल्प, पहूर सांगवी प्रकल्प व घोडसगाव लघुपाटबंधारे प्रकल्प (ता. पाचोरा) येथील शेकडो प्रकल्पग्रस्तांच्या गेल्या अनेक वर्षांपासून संपादित झालेल्या जमिनींचा मोबदला अद्याप मिळालेला नव्हता. याबाबत कार्यकारी अभियंता लघुपाटबंधारे विभाग जळगाव व प्रकल्पग्रस्त शेतकरी यांचा तडजोडीचा प्रस्ताव तयार होता. तरीही गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांना मोबदला न मिळाल्यामुळे ते हलाखीचे जीवन जगत होते. बरेचसे शेतकरी, विधवा महिला व सहारा नसलेले वृद्ध होते. हा प्रकल्प तडजोड प्रस्ताव मंजूर होण्यासाठी श्री. गरुड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा व लाभक्षेत्र विकासमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सतत पाठपुरावा करून ही रक्कम मंजूर करून आणली. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com