नाल्यात रिक्षा बुडून शेंदुर्णी येथील विद्यार्थ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 सप्टेंबर 2019

शेंदुर्णी (ता. जामनेर ) ः येथील होळी मैदान सार्वजनिक गणेश मंडळ भंडाऱ्याचा कार्यक्रम असल्याने केळीचे पान घेण्यासाठी दापोरा येथे शेंदुर्णी येथील युवक गेले होते. सोमवारी सकाळपासून परिसरात मुसळधार पाऊस असल्याने रोटवद- कासमपुरा भागातील नदी नाल्यांना पुर आलेला होता. या नाल्यात रिक्षा वाहून गेल्याने यामध्ये बसलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू झाला. 

दापोरा येथून केळीचे पान घेऊन परत येत असतांना रात्री साडेआठच्या सुमारास अचानक पावसाचा जोर वाढल्याने नाल्याला पूर आला. यात रिक्षा पलटी झाली. रिक्षात बसलेले काही जण वाहून गेली. यात सुनील गुजर, पांडुरंग गुजर, संदीप गुजर, प्रफुल्ल गुजर, सौरभ गुजर, बंटी गुजर हे झाडांच्या फांद्या व मुळांच्या आधाराने पाण्याच्या प्रवाहातून वाचले. मात्र दिनेश गुजर हा विद्यार्थी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने बेपत्ता झाला होता. रात्रभर त्याचा शोध सुरू होता. अंधार असल्याने दिनेश सापडून आला नसून आज सकाळी येथून चार किलोमीटरवर असलेल्या सारवा नांद्रामधील भोजे नाला येथे त्याचा मृतदेह आढळून आला. शेंदुर्णी येथील सरस्वती शाळेतील पाचवीतील विद्यार्थी होता. जामनेर येथील रुग्णालयात त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. विद्यायार्थ्याच्या घरची परिस्थिती अंत्यत बिकट आहे. आई- वडील मजूरीची कामे करतात. एकूलता मुलगा असल्याने कुटुंबीयासह परिसरात शोककळा पसरली आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shendurni student death water heavy rain