शिंदखेडा तालुक्‍यात कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 13 मे 2018

भडणे (ता. शिंदखेडा) ः येथील रहिवासी एका चाळीस वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आज आत्महत्या केली. कोमलसिंग रजेसिंग गिरासे (वय 40) असे शेतकऱ्याचे नाव आहे. कोमलसिंग गिरासे या शेतकऱ्याने विषारी द्रव्य प्राषन करून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. विषारी द्रव्य प्राषन केल्यानंतर त्यांना अत्यवस्थ स्थितीत रूग्णालयात नेले; परंतू यापुर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. प्राथमिक माहितीनुसार सदर शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केल्याचे समजते. त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले आहेत. पोलिस तपास सुरू असून, तलाठीकडून 7/12 कर्जाबाबतचा अहवाल मागविण्यात आला आहे. 

Web Title: marathi news shindkheda former sucide

टॅग्स