शिरपूर ब्रेकिंग : आमोदे गावातील 45 वर्षीय महिला कोरोना "पॉझिटीव्ह' 

शिरपूर ब्रेकिंग : आमोदे गावातील 45 वर्षीय  महिला कोरोना "पॉझिटीव्ह' 

शिरपूर : शहरालगत आमोदे (ता.शिरपूर) येथील 45 वर्षीय महिलेची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून मध्यरात्रीपासून पालिका क्षेत्रासह आमोदे, शिंगावे, मांडळ ही गावे सील करण्यात आली. 25 एप्रिलपर्यंत या परिसरात संपूर्ण लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. 

आमोदे येथील 45 वर्षीय महिलेस सर्दी, ताप, घसा खवखवणे आदी लक्षणे जाणवत होती. स्थानिक डॉक्टरकडून उपचार घेऊनही फरक न पडल्याने 21 एप्रिलला तिला धुळे येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रवाना करण्यात आले. काल रात्री उशिरा तिची चाचणी पॉझिटिव्ह आल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला. 

मुंबई कनेक्शन

संबंधित महिला आठ दिवसांपूर्वी मुंबईहून आमोदे येथे आली असल्याची प्राथमिक माहिती आहे. तिच्या संपर्कातील कुटुंबियांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्याचे काम सुरू आहे. तिची ट्रॅव्हल हिस्ट्रीदेखील तपासली जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रसन्न कुलकर्णी यांनी दिली. 

लॉकडाऊन जाहीर

दरम्यान मध्यरात्रीपासून प्रशासनाने आमोदे गाव, अजंदे, मांडळ आणि शिरपूर शहर हा परिसर सील केला. प्रांताधिकारी डॉ.विक्रमसिंह बांदल यांनी या परिसरात 25 एप्रिलपर्यंत संपूर्ण लॉकडाऊन घोषित केले. याकाळात हाॅस्पिटल व औषधांची दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहतील. लाॅकडाऊनच्या काळात कोणीही नागरिकाने कायद्याचे उल्लंघन केल्यास त्याच्या विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि कलम 188 नुसार कारवाई करण्यात येईल असे डाॅ. बांदल यांनी आदेशात म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com