esakal | शिरपूरला जीवितापेक्षा व्यसन ठरतेय वरचढ! 
sakal

बोलून बातमी शोधा

Gambling

"फिजिकल डिस्टन्सिंग'चे नियम आणि संसर्गाची भीती फाट्यावर मारून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने जुगाराचे अड्डे गर्दीने बहरल्याचे आढळल्याने ती चिंतेची बाब ठरली आहे. 

शिरपूरला जीवितापेक्षा व्यसन ठरतेय वरचढ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

शिरपूर ः "कोरोना'चा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने "लॉक डाउन'सह संचारबंदी लागू केली आहे. प्रत्येकाला घरातच थांबण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, काही जणांना जीविताच्या भीतीपेक्षाही व्यसन अधिक गरजेचे भासत असल्याचे थाळनेर पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतर स्पष्ट झाले. "फिजिकल डिस्टन्सिंग'चे नियम आणि संसर्गाची भीती फाट्यावर मारून अक्षयतृतीयेच्या निमित्ताने जुगाराचे अड्डे गर्दीने बहरल्याचे आढळल्याने ती चिंतेची बाब ठरली आहे. 

नक्की वाचा :   मृतदेहांची आबाळ थांबविणार कोण? 

अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर थाळनेर पोलिसांनी रविवारी तरडी- भावेर (ता. शिरपूर) शिवारातील शेतामध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून 93 हजार 370 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत दहा जणांना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी सावळदे (ता. शिरपूर) गावात छापा टाकून संशयितांकडून एक लाख 58 हजार 330 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. घोडसगाव येथील जुगार अड्ड्यावरही कारवाई झाली. या तिन्ही कारवायांमध्ये सुमारे 25 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

आर्वजून पहा :  कोटात अडकलेल्या विद्यार्थ्यांसाठी धुळे आगारातून 70 बस रवाना 
 

मास्क, फिजिकल डिस्टन्सिंग असे कोणतेही नियम न पाळता हे जुगारी बिनधास्त जुगार खेळत असल्याचे आढळले. यामुळेत यांच्यावर जुगारासह साथरोग प्रतिबंधक कायद्याचे उल्लंघन केल्याचा गुन्हाही दाखल झाला. जुगार अड्ड्यांवर सापडलेल्या संशयितांमध्ये काही तालेवार, सुशिक्षित मंडळीही आहेत. त्यामुळे स्वतःच्या जीवापेक्षा व्यसन अधिक महत्त्वाचे मानणाऱ्यांचे करायचे तरी काय, असा प्रश्न पोलिसांसमोर उभा राहिला.

क्‍लिक कराः मालेगावात बंदोबस्तावरील जळगावचे दोन पोलिस कोव्हिड पॉझेटिव्ह 
 

loading image