अंबासन (जि.नाशिक) मान्सून सुरू होऊनही तालुक्यासह परिसरात पाठ फिरवलेल्या पावसाला साकडे घालण्यासाठी बागलाण तालुक्यातील करंजाड येथील शिवमंदिरातील महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक करून मंदिराचा गाभारा पाण्याने भरला.या जलभिषेकमध्ये अख्खा गाव सहभागी झाला होता.
बळीराजाने घरातील सोनं गहाण ठेऊन बियाणे घेऊन पेरण्या केल्या मात्र पावसाअभावी पेरणी केलेली बियाणे पावसाने पाठ फिरवल्याने काही प्रमाणात उतरलेले बियाणे वा-याच्या झुळकीबरोबर उडू लागले आहे. यामुळे दुबार पेरणीचे संकट शेतक-यावर येऊन ठेपले आहे. पावसासाठी ठिकठिकाणी महादेवाला साकडे घातले जात आहे. तर काही ठिकाणी नमाज पठण केले जात आहे. करंजाड येथील शिवमंदिराचा गाभारा पाण्याने भरून पावसासाठी देवालाच साकडे घालण्यात आले.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.