विनापरवानगी मिरवणूकीबद्दल आमदार डॉ. हिरे, सुनील बागुल यांच्यावर गुन्हा दाखल 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 फेब्रुवारी 2018

नाशिक : छत्रपती शिवाजी महाराज जयंतनिमित्ताने श्री शिवजन्मोत्सव समितीतर्फे काढण्यात आलेल्या विनापरवानगी मिरवणुकीसंदर्भात भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, आमदार डॉ. अपूर्व हिरे यांच्याविरोधात मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज जयंती गेल्या सोमवारी सर्वत्र साजरी करण्यात आली. याच पार्श्‍वभूमीवर श्री शिवजन्मोत्सव समितीमार्फत सोमवारी (ता.19) गोल्फ क्‍लब मैदानावरून पालखी मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीसाठी समितीतर्फे मागण्यात आलेल्या परवानगीला पोलीस आयुक्तालयाने मंजुरी दिली नव्हती. तरीही समितीतर्फे सदरची पालखी मिरवणूक काढण्यात आली. तर पोलीस आयुक्तालयाने शहरात जमावबंदी आदेश लागू केलेला असताना त्याचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत समितीचे अध्यक्ष व भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, आमदार डॉ. अपूर्व हिरे, करण गायकर, सुरेश बाबा पाटील, चंद्रकांत बनकर, शिवाजी सहाणे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. समितीतर्फे गोल्फ क्‍लब ते पंचवटी कारंजापर्यंत मिरवणूक काढण्यात आली होती. याप्रकरणी मुंबई नाका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक सुरेंद्र सोनवणे हे करीत आहेत. 
 
Web Title: marathi news shivjayanti miravnuk