बाळासाहेबांच्या पुतळ्याची प्रतीक्षाच 

jalgaon shivsena
jalgaon shivsena

जळगाव : शहरातील स्वातंत्र्य चौकात रिमांडहोमजवळ शिवसेनाप्रमुख (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याचा ठराव महापालिकेच्या महासभेत करण्यात आला होता. हा ठराव होऊन पाच वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. मात्र, अद्याप पुतळा उभारणीचे काम महापालिका प्रशासनाने हाती घेतलेले नाही. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज उपायुक्तांना भेटून त्वरित पुतळा उभारणीचे काम सुरू करावे, अशी मागणी निवेदनाद्वारे केली. यासंदर्भात तातडीने कार्यवाही न झाल्यास शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल, असा इशाराही यावेळी पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी दिला. 

महापालिकेच्या महासभा व स्थायी समिती सभांमध्ये अनेकदा (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्यासंदर्भात अधिकाऱ्यांना विचारणा तसेच पाठपुरावा करुनही प्रशासनाकडून पुतळा उभारण्याची प्रक्रिया अद्याप सुरू केलेली नाही. त्यामुळे आज महापालिकेत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धडक देत उपायुक्त अजित मुठे यांची भेट घेतली. यावेळी महापालिका शिवसेनेचे विरोधी पक्षनेते सुनील महाजन, माजी महानगरप्रमुख गजानन मालपुरे, माजी नगरसेवक चेतन शिरसाळे यांच्यासह शेखर शिंपी, विजय राठोड, विजय चौधरी, राहुल नेतलेकर, भय्या वाघ, शिवराज पाटील, जितेंद्र बारी, महेंद्र पाटील, विनायक पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते. 

"जानेवारीत पुतळा उभारणी प्रारंभ करा' 
उपायुक्तांशी चर्चा करताना संतप्त शिवसैनिकांसह गजानन मालपुरे यांनी उपायुक्तांना ठराव होऊनही प्रशासनाकडून का विलंब होत आहे. महापालिका प्रशासनाने 23 जानेवारीला पुतळा उभारणीच्या कामास प्रारंभ करावा, अशी मागणी केली. जर जानेवारीत पुतळा उभारणीच्या कामाला सुरवात झाली नाही, तर "सेनास्टाईल' आंदोलन करून आमच्या पद्धतीने पुतळा बसवू, असा इशारा दिला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com