शिवसेनेच्या महानगरप्रमुखपदी सचिन मराठे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

शिवसेनेच्या महानगरप्रमुख पदी सचिन मराठे 
नाशिक : शिवसेनेने संघटनात्मक पातळीवर बदल करण्यास सुरुवात केली असून पहिल्या टप्प्यात महानगरप्रमुख पदी माजी नगरसेवक सचिन मराठे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अजय बोरस्ते यांच्याकडे महानगरप्रमुख पदासह विरोधी पक्षनेते पद असल्याने एक व्यक्ती एक पद या तत्वानुसार बोरस्ते यांच्याकडचा महानगरप्रमुख पदाचा भार हलका केला आहे. दोन जिल्हाप्रमुख पदाच्या धर्तीवर शहरातही दोन महानगरप्रमुख राहणार असून दुसरे महानगरप्रमुख म्हणून महेश बडवे यांचे नाव चर्चेत आहे. 

महापालिकेच्या निवडणुका झाल्यानंतर शिवसेनेत संघटनात्मक बदल होणार असल्याची चर्चा होती. निवडणूका झाल्यानंतर राजकीय वातावरण स्थिरस्थावर होण्याच्या दृष्टीने त्यावेळी निर्णय झाला नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर संघटनात्मक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन पदे असलेल्या पदाधिकाऱ्यांचा भार हलका करून त्यांना निवडणुकीसाठी अधिक वेळ देण्याच्या दृष्टीने एका पदाचा कार्यभार ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार महानगरप्रमुख पदी सचिन मराठे व महेश बडवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

सचिन मराठे यापुर्वी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख पदावर होते. सन 2002 पासून 2012 पर्यंत सलग तीन वर्षे नगरसेवक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अजय बोरस्ते महानगरप्रमुख असताना त्यांनी उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा मेळावा, भाजप सरकार विरोधात नाशिककरांच्या प्रश्‍नावर सर्वात मोठा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. त्याचबरोबर शाखा पातळीवर संघटना बांधणीचे काम त्यांनी केले. दरम्यान महानगर प्रमुख पदाची घोषणा शिवसेनेच्या सामना मुखपत्रातून होणार आहे. त्यानंतरचं अधिकृत पदे मानली जाणार आहे. 
 
Web Title: marathi news shivsena mahanagar chief