इंधन दरवाढीविरोधात शिवसेनेचा धडक मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2018

नाशिक : पेट्रोल, डिझेलसह गॅस सिलिंडरची दरवाढ व त्यामुळे झालेल्या महागाईचा निषेध करत शिवसेनेतर्फे शुक्रवारी (ता. 5) धडक मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या या मोर्चाच्या सुरवातीला स्वत:ला चाबूक मारून घेताना महागाईने त्रस्त नागरिक व ट्रॅकवर फास लावलेली दुचाकी यांसह इंधन परवडत नसल्याने बैलगाडीचा प्रवास करतानाचे आंदोलनकर्ते लक्ष वेधत होते. 

शालिमार येथील शिवसेनेच्या कार्यालयापासून धडक मोर्चाला सुरवात झाली. इंधनाच्या भाववाढीमुळे भडकलेल्या महागाईला जबाबदार मोदी सरकारचा निषेध करत आंदोलनकर्त्यांनी घोषणाबाजी केली. "भीक नको हक्क हवा, तो मिळून देईल शिवसेना' यासह "जय भवानी, जय शिवाजी', "हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो', "मोदी सरकारचं करायचं काय, खाली डोकं वरती पाय' आदी घोषणांनी आंदोलनकर्त्यांनी शहरातील रस्ते दणाणून सोडले होते. भगवे ध्वज, टोप्या आणि स्कार्फमुळे आंदोलनात वातावरणनिर्मिती झाली होती. 

शिवसेना कार्यालयापासून सीबीएस, शिवाजी रोडमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचा समारोप झाला. आंदोलनात शिवसेनेचे संपर्क नेते भाऊलाल चौधरी, खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, महानगरप्रमुख सचिन मराठे, महेश बडवे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, माजी महानगरप्रमुख अजय बोरस्ते, सत्यभामा गाडेकर, नगरसेवक विलास शिंदे, माजी महापौर विनायक पांडे, ऍड. यतीन वाघ, सूर्यकांत लवटे, दिलीप दातीर, डी. जी. सूर्यवंशी, ऍड. शामला दीक्षित, देवानंद बिरारी, अजीज शेख, योगेश बेलदार आदी सहभागी झाले होते. 

साथीच्या आजाराने भयभीत 
आंदोलनकर्त्यांना मास्कचा आधा
र 

सध्या शहरात डेंगी, स्वाइन फ्लूसह अन्य विविध साथींच्या आजारांनी डोके वर काढले आहे. या पार्श्‍वभूमीवर सतर्कतेची बाब म्हणून आंदोलनातील काही महिला, पुरुषांनी तोंडाला मास्क लावला होता. 
 
Web Title: marathi news shivsena morcha